Corona Vaccination: Nasal Vaccine Will Be Coming Soon !, Second Phase Tests Approved
Corona Vaccination : लवकरच मिळेल नाकावाटे लस!, दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना मंजुरी By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 10:00 AM1 / 8कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला देशात आता वेग आला आहे. ५० कोटींहून अधिक लोकांचे लसीकरण झाले आहे. पाच लसी दिमतीला आहेत. त्यातच नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीचेही आगमन होण्याच्या मार्गावर आहे. 2 / 8नाकावाटे दिली जाणारी बीबीव्ही१५४ ही भारताची पहिली लस आहे. भारत बायोटेक आणि सेंट लुसियाचे वॉशिंग्टन विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ही लस तयार केली जात आहे.3 / 8जानेवारी महिन्यात या लसीच्या पहिल्या चाचणीला सुरुवात झाली. त्यात १८ ते ६० या वयोगटातील स्वयंसेवक सहभागी झाले होते. लसीच्या दुसऱ्या नैदानिक चाचण्यांना परवानगी देण्यात आली आहे.4 / 8इतर लसी दंडातील रक्तपेशीत इंजेक्ट केल्या जातात. नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लसीचे दोन-तीन थेंब नाकात टाकले जातात. इंजेक्शन देण्याची गरज नसते. 5 / 8नोझल स्प्रेसारखीच ही लस आहे.तसाही कोरोना नाकावाटेच शरीरात पसरतो. त्यामुळे नाकावाटे दिली जाणारी लसही कोरोनाला आरंभस्थानीच अटकाव करते. ही सिंगल डोस लस आहे.6 / 8भारत बायोटेकने घेतलेल्या या लसीच्या नैदानिक चाचण्यांमध्ये कोणत्याही स्वयंसेवकावर लसीचे दुष्परिणाम जाणवले नाहीत.7 / 8नाकात प्रतिकारशक्ती वाढीस लागल्यानंतर कोरोना विषाणू फुफ्फुसापर्यंत जाऊ शकणार नाही. आरोग्य सेवकांना प्रशिक्षण देण्याची गरजच भासणार नाही. 8 / 8उत्पादन सहजसोपे असल्याने लस वाया जाण्याचा धोकाही कमी. लस कुठेही नेता येणे शक्य. साठवणुकीचा फारसा प्रश्न निर्माण होणार नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications