शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मेड इन इंडिया! अखेर भारताने 'अशी' तयार केली कोरोनाचा खात्मा करणारी लस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 11:00 AM

1 / 10
जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल एक कोटीचा टप्पा पार केला आहे. तर पाच लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे देशातही कोरोनाचा धोका वाढत आहे. रुग्णांची संख्या सातत्याने नवा उच्चांक गाठत असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे. रुग्णांचा आकडा ६,२५,५४४ वर गेला आहे.
2 / 10
कोरोनाच्या लसीसाठी जगभरात संशोधन सुरू आहे. भारतात कोरोनाच्या लसीच्या माानवी परिक्षणानंतर १५ ऑगस्टपर्यंत भारत बायोटेक, ICMR कडून ही लस लाँच केली जाऊ शकते. या लसीच्या पहिल्या मानवी चाचणीसाठी परवागनी देण्यात आली आहे.
3 / 10
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही लस किती परिणामकारक ठरेल हे मानवी चाचणीतून दिसून येईल. संपूर्ण देशभरात सध्या १२० पेक्षा जास्त लसींवर प्रयोग सुरू आहेत. जर भारतात तयार झालेल्या या लसीची मानवी चाचणी यशस्वी झाली तर भारतात तयार होणारी कोरोना व्हायरसची ही पहिलीच लस असेल. पण ही लस कशी तयार झाली याबाबत आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत.
4 / 10
आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी यांनी एकत्रितपणे भारतातील कोरोनाची ही लस विकसित केली आहे. . ही लस तयार करण्यासाठी NIVने कोरोनाचा संसर्ग झालेल्या पण कुठलीही लक्षणं दिसत नसलेल्या रुग्णाच्या शरीरातून कोरोना व्हायरसचा स्ट्रेन वेगळा काढला. हा स्ट्रेन बीबीआयएलला पाठवला गेला. त्यानंतर बीबीआयएलने त्या स्ट्रेनपासून एक निष्क्रिय लस तयार केली.
5 / 10
त्याचबरोबर रुग्णांवर या औषधाचा परिणाम होऊ नये म्हणून हैदराबादच्या जिनोम व्हॅलीमध्ये असलेल्या भारत बायोटेकच्या बीएसएल -3 हाय कन्टेंनमेंट फॅसिलिटीमध्येही निष्क्रिय व्हायरसपासून ही लस विकसित करण्यात आली आहे.
6 / 10
रुग्णाांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या लसीचे आतापर्यंत चांगले परिणाम दिसून आले आहेत.
7 / 10
या लसीच्या सुरूवातीच्या परिक्षणांसाठी प्राण्यांवर प्रयोग करण्यात आले. प्राण्यांवर केलेल्या लसीत सकारात्मक परिणाम दिसून आले होते.
8 / 10
. त्यानंतर बीबीआयएलने लसीच्या मानवी चाचणीसाठी CDSCO कडे परवानगी मागितली. आता ७ जुलैला मानवी चाचणी होणार आहे.
9 / 10
CDSCO कडून ही लस दोन टप्प्यांमध्ये परिक्षणासाठी वापरली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात फार कमी जणांना लसीचा डोस देण्यात येईल. हा डोस कितपत सुरक्षित ठरतो. हे पाहिल्यानंतर तपासणी केली जाईल.
10 / 10
त्यानंतरच्या टप्प्यात शेकडो लोकांवर परिक्षण करण्यात येणार आहे. या माध्यमातून लसीची परिणामकता तपासली जाणार आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याIndiaभारत