1 / 10देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारनं लसीकरण मोहिमेवर भर दिला आहे. यात १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना कोरोनाची लस दिली जाणार असल्याची घोषणा झाली. त्यानंतर देशभरात आता कोरोना लस घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. 2 / 10यात आता कोरोना लस घेण्यापूर्वी आणि नंतर काय काळजी घ्यायला हवी याबाबत अनेक मार्गदर्शन सूचना पुढे येत आहेत. यात महत्त्वाचं म्हणजे दारू पिणाऱ्यांनी कोविड लस घेण्यापूर्वी काही गोष्टी ध्यानात ठेवा. लस घेण्यापूर्वी आणि नंतर जास्त दारू पिल्याने शरीरात निर्माण होणाऱ्या व्हायरस विरोधात लढणाऱ्या शक्तींवर परिणाम होऊ शकतो. 3 / 10तज्ज्ञांच्या मते, जास्त प्रमाणात दारू प्यायल्याने शरीरातील रोग प्रतिकारशक्तींवर परिणाम होतो. लस घेतल्यानंतर कोरोना व्हायरसशी लढणाऱ्या अँटिबॉडीज शरीरात निर्माण होण्यासाठी काही आठवड्यांचा काळ लागतो. 4 / 10त्यामुळे या कालावधीत जर दारूचं सेवन केले तर ते शरीरासाठी हानिकारक असेल त्याचसोबत कोविड लसीचा चांगल्या परिणामांना शरीरात पसरण्यापासून रोखू शकतं. 5 / 10कॅलिफोर्निया यूनिवर्सिटीच्या सेंटर फॉर व्हायरस रिसर्चमध्ये संचालक इल्हेम मेसाऊदी यांचे म्हणणं आहे की, लसीकरणा दरम्यान कमी दारू घेतल्यास अडचण नाही परंतु ही गोष्ट पाहिली पाहिजे की, कमी दारू(Moderate Drinking) याचा अर्थ काय? 6 / 10जाणून घेऊया heavy Drinking आणि Moderate Drinking म्हणजे काय? कोरोना लस घेण्यापूर्वी आणि नंतर किती प्रमाणात दारू पिणं सुरक्षित आहे. मॉड्रेट ड्रिकिंगमध्ये पुरुषांनी दिवसाला २ डिंक्स आणि महिलांनी दिवसाला १ ड्रिंक्स घेऊ शकतात 7 / 10पण हेवी ड्रिकिंगमध्ये पुरुष दिवसाला ४ किंवा त्यापेक्षा अधिक ड्रिंक्स आणि महिला दिवसाला ३ किंवा त्यापेक्षा ड्रिंक्स घेणं. एक स्टँडर्ड ड्रिंक्सचा अर्थ वाईन १४८ मिली. बिअर ३५५ मिली आणि व्हिस्की ४५ मिली. कोरोना लस घेण्यापूर्वी आणि त्यानंतर पुरुषांनी वाईनचे २९६ मिली तर महिलांनी १४८ मिलीपेक्षा अधिक सेवन करू नये. 8 / 10तर व्हिस्की, रम, वोडका इ. पुरुषांनी ९० मिली तर महिलांनी ४५ मिलीपेक्षा जास्त घेऊ नये. बिअर पुरुषांनी ७१० मिली आणि महिलांनी ३५५ मिलीपेक्षा अधिक घेऊ नये. याबाबत पुढे जाऊन आणखी रिसर्च होऊ शकतो असं यूनिवर्सिटी ऑफ नेब्रास्का मेडिकल सेंटरच्या प्रोफेसर डॉ. एंजेला ह्यूलेट यांनी सांगितले.9 / 10आतापर्यंत केलेल्या रिसर्चमध्ये जास्त दारू पिणाऱ्यांच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता कमी होत असल्याचं दिसून येत आहे. जास्त दारू पिणाऱ्या माकडांवर लसीचा परिणाम काहीच जाणवू आला नाही. तर कमी दारू पिणाऱ्यांमध्ये सामान्यांप्रमाणे अँन्टीबॉडिज तयार होताना आढळल्या. कॅलिफोर्नियात हा रिसर्च माकडांवर करण्यात आला होता. 10 / 10रिसर्चमध्ये आढळलं की, जे माकड खूप काळापासून दारू पित आहेत. त्यांच्या शरीरात लसीकरणानंतर निर्माण होणाऱ्या रोग प्रतिकारशक्तीवर परिणाम होत आहे. उंदरांवर केलेल्या रिसर्चमध्येही असेच निकाल समोर आले. त्याचसोबत लसीकरणानंतर जास्त प्रमाणात दारू प्यायली तर त्याचे अन्य परिणामही समोर येण्याची शक्यता आहे.