शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona vaccine : कोव्हॅक्सीन घेणाऱ्यांसाठी खूशखबर; WHO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 12:34 PM

1 / 7
को-व्हॅक्सीन संदर्भात 29 सप्टेंबरला जारी करण्यात आलेल्या अधिकृत दस्तऐवजांनुसार, जागतिक आरोग्य संघटना (WHO) ऑक्टोबर महिन्यात Covaxin ला मंजूरी देण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेईल. (Corona vaccine World health organization may approve indigenous vaccine covaxin in october)
2 / 7
Covaxin ला लवकरच मिळू शकते मंजुरी - 5 ऑक्टोबरला जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) लसीसंदर्भात तयार झालेला वैज्ञानिकांचा Expert ग्रुप Strategic Advisory Group Of Experts (SAGE) Covaxinला मंजूरी देण्यासाठी बैठक करेल आणि Covaxinला मंजुरी देण्यासंदर्भात निर्णय देईल.
3 / 7
दीड तास चालणार SAGE ची बैठक - SAGE ची ही बैठक Covaxin ला अंतिम मंजूरी देण्यासाठीच होईल. ही बैठक दीड तास चालेल. भारतीय वेळेनुसार, ही बैठक 4 वाजून 45 मिनिटांनी सुरू होईल. या बैठकीत SAGE च्या वैज्ञानिकांशिवाय भारत बायोटेकचे प्रतिनिधीही उपस्थित राहतील.
4 / 7
या बैठकीत कोव्हॅक्सीनच्या भारतात झालेल्या ट्रायलच्या डेटावरून तिची सुरक्षितता आणि प्रभावासंदर्भात चर्चा होईल. यानंतर या लसीला मंजुरी देण्यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटना अंतिम निर्ण देईल.
5 / 7
यापूर्वी, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) Pfizer-BioNTech, AstraZeneca, Johnson and Johnson, Moderna आणि Sinopharm ला मंजुरी दिली आहे.
6 / 7
यापूर्वी, भारत बायोटेकने एका निवेदनात म्हटले होते, की एक लस उत्पादक म्हणून, नियामक मान्यता प्रक्रिया आणि त्याच्या टाइमलाइनवर टिप्पणी करणे आम्ही योग्य मानत नाही. आम्ही शक्य तितक्या लवकर EUL साध्य करण्यासाठी WHO शी परिश्रमपूर्वक काम करत आहोत.
7 / 7
यासंदर्भात, WHO ने भारत बायोटेकला EUL देण्यासाठी आणखी काही डेटा देण्यास सांगितले होते. दोन आठवड्यांपूर्वीच, भारत बायोटेकने आपत्कालीन वापर सूचीसाठी (EUL) जागतिक आरोग्य संघटनेला (WHO) त्याच्या कोविड -19 लसीचा सर्व डेटा सुपूर्द केला होता. तसेच, डब्ल्यूएचओच्या अभिप्रायाची प्रतीक्षा आहे, असे कंपनीने म्हटले होते.
टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना