CoronaVirus: कोरोनावर मात करण्यासाठी गाईचं दूध बनलंय चिनी लोकांचं 'हत्यार'! By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2021 5:40 PM
1 / 10 संपूर्ण जगात कोरोनाचा हैदोस सुरू आहे. भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. तर काही देशांनी या महामारीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळविले आहे. कोरोनापासून बचावासाठी जगभरातील लोक लस घेण्यापासून ते लाइफस्टाइलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल करत आहेत. आपल्यला आश्चर्य वाटेल, की चीनमधील लोक कोरोनाला हरविण्यासाठी गाईच्या दुधाचा सहारा घेत आहेत. (Corona virus china people drink more milk to boost immune system and to overcome Corona!) 2 / 10 शरीरातील प्रोटीनचे प्रमाण वाढविण्यासाठी चीन सरकार तेथील लोकांना जास्तीत जास्त गाईचे दूध प्यायला सांगत आहे. प्रोटीन इम्यून सिस्टम चांगली बनवते, असा दावा केला जात आहे. 3 / 10 गेल्या वर्षी कोरोना पसरल्यानंतर संसदेच्या वार्षीक बैठकीत तेथील कायदा निर्मात्यांनी सरकारला दूध घेण्यासंदर्भात कायदा करण्याचा सल्ला दिला होता. यात प्रत्येक व्यक्तीला रोज किमान 300 ग्रॅम दूध घेण्याचा सल्ला देण्यात आला होता. 4 / 10 ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, शंघाय केहुआशान रुग्णालयात संक्रमक रोग विभागाचे प्रसिद्ध डॉक्टर झांग वेनहोंग यांनी संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात चीनच्या पॅरेंट्सना एक विशेष सल्ला दिला होता. 'आई-वडिलांनी रोज सकाळी मुलांना दूध आणि अंडी देणे सुरू करायला हवे. तसेच ब्रेकफास्टमध्ये 'पोर्रिज' देणे पूर्णपणे बंद करायला हवे,' असे डॉक्टर वेनहोंग यांनी म्हटले होते. 5 / 10 याच मुद्द्यावर चीनमधील अनेक सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर चर्चेला उधान आले आहे. चीनमध्ये अधिकांश लोक ब्रेकफास्टमध्ये बन आणि पोर्रिज (एप्रकारचे जाडे भरडे पीठ) खात होते. लोकांचे म्हणणे आहे, की आपले पारंपरीक खाद्य सोडून दूध आणि टोस्ट खाणे कितपत योग्य आहे. 6 / 10 चीनमधील काही लोक तेथील पारंपरीक खाद्य आणि दुधातून मिळणाऱ्या पोषण तत्वांची तुलना करत आहेत. लोकांचे म्हणणे आहे, की चीनच्या पारंपरीक खाद्यात अॅनिमल प्रोटीन अधिक असते. 7 / 10 तसेच, टीकाकारांचे म्हणणे आहे, की खाण्यापिण्यात कसल्याही प्रकारचा बदल कोरोना होण्यापासून रोखू शकत नाही. तसेच डायटमध्ये इतर पद्धतीनेही प्रोटीनचा समावेश केला जाऊ शकतो. 8 / 10 चिनी सरकारने 2025 पर्यंत 450 लाख टन दूधाचे उत्पादन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. आतापर्यंतच्या उत्पादनाच्या तुलनेत हे प्रमाण 30 पट अधिक आहे. 9 / 10 चीनमध्ये गाईंची देखभाल आणि त्यांच्या आहारावरही विशेष लक्ष दिले जात आहे. मात्र, चीनमधील अनेक पशु कल्याण समूह विविध स्टडीजचा हवाला देत यावर आक्षेप नोंदवत आहेत. गाईचे दूध प्यायल्याने कँसर, डायबेटीज आणि हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात, असे यांचे म्हणणे आहे. 10 / 10 दुध घेण्याच्या सवयीला उत्तेजन देणारे लोकही आहेत. रिसर्चमध्ये सिद्ध झाले आहे, की दूध हे अत्यंत पौष्टीक असते. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की प्राण्यांमध्ये एक विशेष प्रकारची अँटीबॉडी आढळते आणि दूध प्यायल्याने अँटीबॉडी शरीरात जाऊन इम्यून सिस्टीम वाढवते. आणखी वाचा