Corona virus: Corona virus cases is not just because of more testing says who
Corona virus: कोरोना रुग्णांची वाढ होण्यामागे 'ही' बाब कारणीभूत नाही, WHO चा खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 12:23 PM1 / 10कोरोना व्हायरसचा प्रसार संपूर्ण जगभरात वेगाने होत आहे. अनेक देशांतील सरकारच्या म्हणण्यानुसार जास्त प्रमाणात टेस्टिंग केल्यामुळे कोरोना व्हायरसचे जास्त रुग्ण समोर येत आहेत. दरम्यान जागतिक आरोग्य संघटननेने व्हायरसच्या वाढत्या रुग्णांमागे फक्त मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग करणं कारणीभूत नसल्याचे सांगितले आहे. 2 / 10WHO च्या इमरजेंसी प्रोग्रामचे एग्जीक्यूटिव डायरेक्टर माइक रियान यांनी सांगितले की, जास्त टेस्टिंग केल्यामुळे जगभरातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. असं म्हणता येणार नाही. दिवसेंदिवस रुग्णालयांमधील रुग्णांची संख्या वाढत आहे. तसंच मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. 3 / 10कोरोना व्हायरसचे वाढते रुग्ण मोठ्या प्रमाणात टेस्टिंग केल्यामुळे नाही तर या जीवघेण्या व्हायरसने संपूर्ण जगभरात शिरकाव केल्यामुळे समोर येत आहेत.4 / 10WHO च्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या माहामारीने एक रेकॉर्ड कायम ठेवला आहे. रविवारच्या एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्ण समोर येत आहेत. १ लाख ८३ हजार कोरोनाच्या केसेस समोर आल्या आहेत. 5 / 10अमेरिकेत ही माहामारी वेगाने पसरत आहे. जॉन हॉपकिंस यूनिवर्सिटीच्या आकड्यांनुसार सोमवारी कोरोना रुग्णांची संख्या २३ लाखांपेक्षा जास्त होती. कोरोनाचा प्रसार मागच्या आठवडयाच्या तुलनेत २४ टक्क्य़ांनी वाढला आहे. 6 / 10काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेसह जगभरातील देशांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने रुग्णालयांमध्ये भरती झाले होते. तेव्हा अमेरिकेने जास्तीत जास्त टेस्टिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पण शनिवार टेस्टिंगचा वेग कमी करण्याचे आदेश दिले आहेत.7 / 10अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रप यांना सांगितले की, संपूर्ण जगभरात २५ कोटींपेक्षा जास्त टेस्टिंग करण्यात आले आहेत. 8 / 10जर्मनी आणि साऊथ कोरियामध्येही मोठ्या प्रमाणावर टेस्टिंगची सुरूवात करण्यात आली आहे. जोपर्यंत टेस्टिंग केली जाणार नाही तोपर्यंत कोणत्याही देशात जास्त रुग्ण समोर येणार नाहीत. 9 / 10जर्मनी आणि साऊथ कोरियामध्येही मोठ्या प्रमाणावर टेस्टिंगची सुरूवात करण्यात आली आहे. जोपर्यंत टेस्टिंग केली जाणार नाही तोपर्यंत कोणत्याही देशात जास्त रुग्ण समोर येणार नाहीत. 10 / 10जर्मनी आणि साऊथ कोरियामध्येही मोठ्या प्रमाणावर टेस्टिंगची सुरूवात करण्यात आली आहे. जोपर्यंत टेस्टिंग केली जाणार नाही तोपर्यंत कोणत्याही देशात जास्त रुग्ण समोर येणार नाहीत. आणखी वाचा Subscribe to Notifications