शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Delta Variant: सावधान! आता सामान्य सर्दी-खोकलाही असू शकतो कोरोना; दिसून आली पूर्वीपेक्षा वेगळी लक्षणं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2021 10:33 AM

1 / 10
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगातच भीतीचे वातावरण आहे. कोरोना नव-नव्या रुपांसह अधिकाधिक संक्रमक होत चालला आहे. एवढेच नाही, तर तो आपली लक्षणेही बदलू लागला आहे. ताज्या आकडेवारूनुसार, सध्या जगात वेगाने पसरत असलेल्या कोरोनाच्या डेल्टा स्वरूपामुळे (Delta Variant) संक्रमित लोकांत गत वर्षी दिसून आलेल्या कोरोनाच्या सुरुवातीच्या लक्षणांपेक्षाही वेगळी लक्षणं दिसत आहेत.
2 / 10
इंग्लंडमधील ताज्या आकडेवारीनुसार, आपण ज्याला सामान्य सर्दी-खोकला समजतो, तोही आता कोरोनाचे लक्षण असू शकतो.
3 / 10
लोकांत असू शकतात वेगवेगळी लक्षणं - ऑस्ट्रेलियाच्या ग्रिफिथ युनिव्हर्सिटीतील संक्रमक रोग आणि व्हायरलॉजीतील रिसर्च लीडर लारा हरेरो यांच्या मते, सर्वच लोक वेगवेगळ्या रोग प्रतिकारशक्तीमुळे आपापसात भिन्न आहेत. यामुळे मानवांत एक व्हायरस नव-नवे संकेत आणि लक्षणे निर्माण करू शकतो.
4 / 10
हरेरो यांच्या म्हणण्यानुसार, व्हायरस मुळे होणारा आजार दोन महत्त्वपूर्ण घटकांवर अवलंबून असतो. एक म्हणजे, व्हायरसची आपल्या प्रतिकृती बनविण्याचा वेग आणि प्रसाराचे माध्यम आणि दुसरे म्हणजे, म्यूटेशनमुळे व्हायरल घटकांतील बदल.
5 / 10
डेल्टा स्वरूपात काय झाला बदल -  इग्लंडमध्ये, मोबाईल अ‍ॅपद्वारे स्वयंचलित रिपोर्टिंग सिस्टिमद्वारे मिळालेल्या माहितीत कोरोनाच्या सामान्य लक्षणांत बदलाचे संकेत मिळाले आहेत. ताप आणि खोकला नेहमीच कोरोनाचे सामान्य लक्षण राहिला आहे.
6 / 10
काही लोकांत डोकेदुखी आणि गळादुखीही पारंपरिकपणे दिसत आहे. मात्र, नाक वाहणे, हे सुरुवातीच्या काळात विरळच होते. तर, गंध कमी होणे, गेल्या वर्षापासूनच मुख्य लक्षण आहे. मात्र, हे लक्षण आता नवव्या स्थानावर गेले आहे.
7 / 10
सामान्य सर्दी-खोकला असू शकतो - हरेरो म्हणता, डेल्टासंदर्भात आपल्याला अधिक माहिती मिळविण्याची आवश्यकता आहे. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, आपण ज्याला सामान्य सर्दी-खोकला (वाहते नाक आणि गळत दुकणे) समजत आहोत, ते कोरोनाचे लक्षणही असू शकते.
8 / 10
सध्या अचूक उत्तर नाही - वृद्ध लोकांचे अधिकांश लसीकरण झाल्याने आता तरुणांमध्ये संक्रमण वाढले आहे आणि त्यांची हलकी आणि मध्यम स्वरुपाची लक्षणेही दिसत आहेत. असे व्हायरसच्या हळूहळू होणाऱ्या विकासामुळे आणि डेल्टाच्या काही वैशिष्ट्यांमुळेही होऊ शकते. मात्र, लक्षणे बदलण्यामागे नेमके उत्तर अद्यापही सापडलेले नाही.
9 / 10
परिणाम कमी असला तरीही लस प्रभावी - खरे तर, कोरोनाच्या नव्या स्वरुपामुळे लशीचा परिणाम कमी होऊ शकतो, यात कुठलेही दुमत नाही. मात्र, ऑस्ट्रेलियासह काही देशांत डेल्टापासून बचावासाठी फायझर आणि एस्ट्राजेनेकाचे दोन्ही डोस पुरेसे आहेत. हे दोन्ही डोस संक्रमणाविरोधात 90 टक्क्यांपर्यंत प्रभावी आहेत.
10 / 10
सुपर स्प्रेडर इव्हेंटमध्ये दोन्ही डोस घेतलेले सुरक्षित - नुकतेच, न्यू साउथ वेल्समध्ये झालेल्या सुपर स्प्रेडर स्थितीमुळे लसीच्या उपयुक्ततेची माहिती मिळाली. तेथे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या 30 पैकी 24 लोक डेल्टा संक्रमित होते. महत्वाचे म्हणजे यांपैकी कुणीही कोरना लस घेतलेली नव्हती. मात्र, इतर सहा लोक संक्रमित झाले नाही. कारण, त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले होते. म्हणजेच लस प्रभावी आहे. भलेही काही प्रकरणात लस घेतल्यानंतरही संक्रमण शक्य आहे, मात्र याचा गंभीर परिणाम होणार नाही.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य