Corona virus dr fauci says half an effective vaccine can control covid 19
..... तर २०२१ च्या शेवटापर्यंत कोरोनाची माहामारी पूर्ण नष्ट होणार; तज्ज्ञांचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 11:39 AM1 / 9कोरोनाच्या लसीवरून संपूर्ण जगभरातील तज्ज्ञ दिवसरात्र मेहनत करत आहेत. प्रत्येक कोरोनाबाधित देशासाठी ही माहामारी कमी करण्यासाठी लस किंवा औषधाचा शोध लावणं आवाहनात्मक ठरलं आहे. अशा स्थितीत संपूर्ण जगाला कोरोनापासून फक्त लस वाचवू शकते. 2 / 9इंफेक्शियस डिसीज़ एक्सपर्ट एंथॉनी फौसी यांनी दिलेल्या माहितीनुसार कमी प्रभावशाली असलेली लस सुद्धा या माहामारीपासून लोकांना वाचवू शकते. 3 / 9अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचे कोरोना व्हायरसचे सल्लागार डॉक्टर फौसी यांनी एका टेलिव्हिजन मुलाखतीमध्ये दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरससाठी तयार झालेली लस १०० टक्के प्रभावशाली ठरेल याबाबत माहिती देता येऊ शकत नाही. कमी प्रभावी असलेली लस उपलब्ध झाल्यास एका वर्षाच्या आत आपण सामान्य जीवन जगू शकतो. 4 / 9फौसी यांनी मागच्या आठवड्यात दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसची लस ९० टक्के प्रभावी असल्याची शक्यता कमी आहे. ५० ते ६० टक्के प्रभावी असलेली लस परिणामकारक ठरू शकते. ही लस इन्फेक्शन कमी करण्यासाठी उपयोगी ठरेल असं तज्ज्ञांचे मत आहे. 5 / 9फौसी यांनी पुढे यांनी सांगितले की, जर आपण पुढच्या वर्षाच्या सुरूवातीपर्यंत लस मिळवण्यास यशस्वी ठरलो तर २०२१ च्या शेवटापर्यंत माहामारीवर नियंत्रण मिळवण्यात यश येऊ शकतं. 6 / 9एका मुलाखतीदरम्यान कोरोनाची माहामारी २०२४ च्या शेवटापर्यंत लोकांसोबत राहिल का असं फौसी यांना विचारण्यात आलं होतं. यावर ते म्हणावे की जास्तीत जास्त २०२१ च्या शेवटापर्यंत ही माहामारी जाऊ शकते.7 / 9 सुरक्षित आणि प्रभावशाली लस मिळाली नाही तर आणखी काही वर्ष समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एंथोनी फौसी यांनी रशियाच्या कोरोना लसीवर संशय व्यक्त केला आहे. 8 / 9रशियाच्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या गुणवत्तेबद्दल आम्हाला अनेक शंका आहेत, असे डॉ. अँथनी फौसी यांनी सांगितले. ते म्हणाले की, एखादी लस बनविणे व ती सुरक्षित या वेगळ्या गोष्टी आहेत.9 / 9लोकांचा जीव धोक्यात घालून त्यांना लस देणं असं अमेरिकाही करून शकते. पण एक आदर्श लस लोकांचा जीव धोक्यात घालणं नाही तर धोक्यातून बाहेर काढण्याचं काम करत असल्याचे फौजी यांनी सांगितले. आणखी वाचा Subscribe to Notifications