Corona Virus health tips post covid 19 disease
Corona Virus : काळजी घ्या! श्वास घेण्यास त्रास... कोरोना पाठ सोडेना; बरं झाल्यावर 'या' आजारांचा मोठा धोका By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 12:03 PM1 / 8कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला. अनेक देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाने लोकांना केवळ शारीरीकच नाही तर मानसिकदृष्ट्याही प्रभावित केले आहे. 2 / 8कोरोना व्हायरसमुळे हृदय, फुफ्फुस, किडनी आणि इतर अवयवांवरही परिणाम झाला आहे. एकदा कोरोना झाल्यानंतर अनेक आजारांचा धोका वाढला आहे. चुकीची जीवनशैली आणि निष्काळजीपणा यामुळे त्याचा परिणाम दीर्घकाळ दिसून येतो. 3 / 8कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीचे अनेक उपाय करण्यात येत आहेत. कोरोनानंतर होणारे अनेक आजार हे कोविड 19 नंतरचे दुष्परिणाम मानले जातात. कोविड नंतर उद्भवणाऱ्या आरोग्यविषय समस्यांबद्दल जाणून घेऊया…4 / 8कोरोनाचे बळी ठरलेल्यांमध्ये नैराश्य, चिंता, स्मरणशक्ती कमी होणे या समस्या दिसून आल्या आहेत. आपली माणसं गमावणं, दीर्घकाळ एकटं राहणे आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणं यामुळे अनेक समस्या होतात. तसेच मानसिक आरोग्यावर परिणाम दिसू लागला आहे.5 / 8ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे त्यापैकी बहुतेकांना कफची तक्रार आहे. खोकला, श्वासोच्छवासाच्या त्रासाची समस्या आहे. ज्यांना आधीच श्वसनाचा त्रास आहे ते लोक यामुळे अधिक चिंतेत आहेत.6 / 8कोरोनाच्या काळात तणावामुळे अनेक जण हायपरटेन्शनच्या विळख्यातही आले आहेत. कोरोनाच्या साथीनंतर बीपीच्या समस्याही वाढल्या आहेत.7 / 8कोविड 19 नंतर, लोकांमध्ये हृदयविकार देखील दिसू लागले आहेत. कोविडच्या विळख्यात आलेल्या लोकांच्या हृदयाचे ठोकेही अचानक असामान्य होत आहेत. रक्ताच्या गुठळ्या होणं, हृदय बंद पडणं अशा तक्रारीही येत आहेत.8 / 8कोरोना व्हायरसने शरीराला निरोगी ठेवणाऱ्या अनेक प्रोटीनचे नुकसान केले आहे. त्यामुळे कॅन्सरचा धोकाही वाढू शकतो. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यामुळे अनेक गंभीर आजारांनी डोके वर काढले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications