Corona virus : List of germ and dirty places in your office, know for prevent from corona virus
Corona virus : टॉयलेटपेक्षाही घातक असतात ऑफिसमधील 'या' गोष्टी, कोरोनाला बळी पडण्याआधीच व्हा सावध! By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 11:24 AM1 / 12कोणताही आजार निर्माण होत असतो तेव्हा त्यामागे अनेक अस्वच्छता आणि प्रदुषण तयार करणारे घटक कारणीभूत असतात. ज्यासाठी स्वच्छता नसते. त्या ठिकाणी किटाणूंचा प्रसार जलद गतीने होत असतो. तुम्ही तुमच्या घरातील साफसफाईकडे चांगल्या पध्दतीने लक्ष देत असाल. तुम्ही ज्या ऑफिसमध्ये काम करता त्या ठिकाणी असे असंख्य बॅक्टेरिया असतात त्याबद्दल तुम्हाला कल्पना सुद्धा नसते. कोरोना व्हायसरमुळे सध्या भितीचं वातावरण पसरलं आहे. अशाच तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर इन्फेक्शनला बळी पडू शकता. 2 / 12ऑफिसमध्ये तुम्ही रोज ८ ते ९ तास घालवत असता. ऑफिसमधील काही वस्तु अशा असतात. ज्यांचया संपर्कात आल्यामुळे तुमच्या शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या वस्तु आहेत ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. 3 / 12लिफ्टच्या बटनाला दिवसभरात अनेक लोक हात लावत असतात. त्यामुळेच या बटणांवर अनेक बॅक्टरिया आलेले असतात. तुम्ही सुद्धा ऑफिसच्या लिफ्टच्या बटणांना हात लावत असाल तर हात धुवा किंवा सॅनिटायजरचा वापर करा. 4 / 12कोणत्याही ऑफिसमधल्या दरवाज्याच्या हॅण्डलचा जर तुम्ही वापर करत असाल तर जितक्या लोकांचे हात त्या हॅण्डलला लागणार आहेत. तितक्या लोकांना हा आजार पसरण्याची शक्यता असते. त्यासाठी ऑफिसच्या कोणत्याही दरवाज्याच्या हॅण्डलला हात लावल्यानंतर त्वरीत हात धुवा. 5 / 12दिवसभरात अनेक लोक पाणी पिण्यासाठी वॉटर कुलरचा वापर करत असतात. पण तुम्हाला माहितही नसेल इतके लोक पाणी पिण्यासाठी वॉटरकुलरचा वापर करत असतात. जर तुम्हाला आजारांपासून वाचायचं असेल तर घरून पाण्याची बाटली आणा. कारण सतत मशिनच्या संपर्कात आल्यामुळे बॅक्टेरिया पसरण्याचा धोका असतो. 6 / 12त्याप्रमाणे अनेक लोक कॉफी घेण्यासाठी मशिनचा वापर करतात. या मशिनवर सुद्धा बॅक्टेरिया असू शकतात. त्यामुळे आजार पसरण्याची शक्यता असते.7 / 12तुम्हाला असं वाटत असेल की धुतल्यानंतर कॉफी मग साफ होतात. पण असं नाही. ऑफिसमधल्या धुतलेल्या मगवर सुद्धा बॅक्टेरिया तसेच असतात. यावर उपाय म्हणून तुम्ही ऑफिसमध्ये स्वतःचा मग वेगळा ठेवा. 8 / 12ऑफिसमधला फोन अनेकदा इन्फेक्टेड बॅक्टेरियांसह असू शकतो. त्यामुळे फोन वापरताना सॅनिटायजर हाताला लावून मगच फोन वापरा.9 / 12ऑफिसमधिल इतर वस्तू प्रिंटर, फॅक्स मशिन या ठिकाणी किटाणू असू शकतात. कारण एकावेळी अनेक लोक या वस्तुंचा वापर करत असतात. म्हणून या मशिनच्या वापरानंतर सॅनिटायजरचा वापर करा. 10 / 12तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असताना शिंका किंवा खोकला आल्यानंतर जर तुम्ही किबोर्ड किंवा माऊसला हात लावाल तर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. म्हणून इतरांच्या डेस्कचा वापर टाळा. तसंच तुमच्या डेस्कचा वापक इतरांना करू देऊ नका.11 / 12तुमच्या ऑफिसच्या वॉशरूममध्ये ई बॅक्टेरीया असू शकतात. त्यामुळे सार्वजनिक वॉशरूम वापल्यानंतर तसंच वापरण्याआधी हात स्वच्छ धुणं गरजेचं आहे. 12 / 12तुमच्या ऑफिसच्या वॉशरूममध्ये ई बॅक्टेरीया असू शकतात. त्यामुळे सार्वजनिक वॉशरूम वापल्यानंतर तसंच वापरण्याआधी हात स्वच्छ धुणं गरजेचं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications