Corona Virus may raise risk of diabetes in children tips to avoid diabetes in kids
कोरोनामुळे लहान मुलं डायबिटीजच्या विळख्यात; 'असं' ठेवा सुरक्षित, तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2022 11:55 AM1 / 14वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील रुग्णांच्या संख्येने तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला असून पाच लाखांहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. 2 / 14मधुमेहाचा (Diabetes) आजार आता फक्त मोठ्यांनाच नाही तर लहान मुलांनाही होत आहे. विशेषत: कोरोना महामारीमध्ये लहान मुलांमध्ये मधुमेहाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रिसर्चमध्ये याबाबत खुलासा करण्यात आला आहे. 3 / 14संशोधकांना एका रिसर्चमध्ये आढळून आलं आहे की कोरोनाची लागण झालेल्या मुलांना मधुमेह होण्याचा धोका वाढतो. पालकांनी यामुळे वेळीच सावध होण्याची गरज असून लहान मुलांची काळजी घ्या.4 / 14सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या संशोधकांच्या मते, 18 वर्षांखालील मुले जे कोरोना व्हायरसपासून बरे झाले आहेत त्यांना टाइप 1 किंवा टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका लक्षणीयरीत्या वाढला आहे. कोरोना झाल्यानंतर मुलांमध्ये मधुमेहाच्या नवीन रुग्णांमध्ये 2.6 पट वाढ झाली आहे.5 / 14डॉ. अस्मिता महाजन, सल्लागार निओनॅटोलॉजिस्ट आणि बालरोगतज्ञ, एसएल रहेजा हॉस्पिटल (माहिम) म्हणतात की, महामारीच्या काळात 13-15 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले. 6 / 14कोरोनाची लागण झालेल्या मुलांमध्ये जास्त तहान लागणे, अंथरुण ओले होणे, अचानक वजन कमी होणे यासारखी लक्षणे दिसल्यास त्यांना डॉक्टरांना दाखवावे. कोरोनाच्या काळात मुलांची शारीरिक हालचाल कमी होणे, बेशिस्त जीवनशैलीमुळे मधुमेहाचा धोकाही वाढू शकतो.7 / 14साथीच्या रोगाच्या प्रारंभासह, बहुतेक मुलांना टाइप-2 मधुमेह होण्याचा धोका वाढतो, जो जीवनशैलीचा आजार आहे. ताणतणाव, नैराश्य, जीवनशैलीतील बदल ही या आजाराची प्रमुख कारणे आहेत. 8 / 14दिवसेंदिवस गॅजेट्सचा वापर, घरी बसून, ऑनलाईन क्लासेस यामुळे गेल्या दोन वर्षांत मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला आहे. त्यांपैकी आरोग्यासाठी चांगल्या नसलेल्या खाण्याच्या सवयी, झोपेची पद्धत, लक्ष न लागणं हे देखील मधुमेहाचे प्रमुख घटक असू शकतात. 9 / 14शारीरिक हालचालींच्या अभावामुळे मुलांमध्ये लठ्ठपणा वाढला आहे, ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. मुलांच्या शरीराची हालचाल होऊ द्या. स्क्रीन वेळ कमी करा. मोबाईल, लॅपटॉप, टीव्हीवर कमी वेळ घालवू द्या.10 / 14चिमुकल्यांना संतुलित आहार द्या आणि पुरेसे पाणी प्यायला सांगा. जंक फूडचे सेवन टाळा. दररोज रात्री 8 ते 9 तासांची झोप घ्या, मुलांचे वजन वाढू देऊ नका या सर्व गोष्टींचं पालन करून मुलांना सुरक्षित ठेवता येतं.11 / 14डॉ. गुरुदत्त भट्ट, सल्लागार बालरोगतज्ञ, फोर्टिस हॉस्पिटल (कल्याण, मुंबई) म्हणतात की मुलांची प्राथमिक तपासणी आणि जीवनशैलीत बदल करणे ही पालकांची जबाबदारी आहे. पालकांना त्यांच्या प्रत्येक कामाकडे, खाण्याकडे लक्ष द्यावे लागते. 12 / 14मुलांचा दिनक्रम बदला. ते केव्हा झोपतात, कधी जागे होतात याकडे लक्ष द्या. गेल्या दोन वर्षांत मुलांच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे, त्यामुळे त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चालले आहे याकडे लक्ष द्या. 13 / 14जर एखाद्या मुलास मधुमेह होत असेल तर तो नियंत्रणात ठेवण्यासाठी पालकांनी नियमितपणे मुलाच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी तपासावी लागेल. जर मुलाची साखरेची पातळी जास्त राहिली तर त्याला दीर्घकालीन हृदयविकाराचा धोका देखील असू शकतो. 14 / 14लहान मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं अत्यंत महागात पडू शकतं. पालकांनी मुलांच्या सवयीकडे नीट लक्ष द्यावं. त्यांच्या आरोग्यासाठी घातक असलेल्या सवयी वेळीच बदलणं आवश्यक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications