शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : कोरोनातून बरं झालेल्या लोकांना हार्ट अटॅक, स्ट्रोकचा दुप्पट धोका?; शास्त्रज्ञांचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 2:38 PM

1 / 10
संपूर्ण जगाने कोरोना व्हायरसच्या महाभयंकर संकटाचा सामना केला आहे. कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक देशांत अजूनही लोक भीतीच्या छायेखाली जगत आहेत. कोरोनाचं संकटं अद्याप पूर्णपणे टळलेलं नाही.
2 / 10
कोरोनाने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या रिसर्चमध्ये शास्त्रज्ञांनी धक्कादायक खुलासा केला आहे की जे लोक कोरोनापासून बरे झाले आहेत त्यांना हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा दुप्पट धोका असू शकतो.
3 / 10
अमेरिकन शास्त्रज्ञांनी हा रिसर्च केला असून तो गेल्या आठवड्यात प्रकाशित झाला आहे. या रिसर्चमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग झालेल्या १० हजार लोकांवर संशोधन करण्यात आले.
4 / 10
तीन वर्षे या लोकांना ट्रॅक करण्यात आलं आणि असं आढळून आलं की, ज्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे त्यांना हार्ट अटॅक, स्ट्रोक किंवा मृत्यूचा धोका दुप्पट आहे.
5 / 10
ज्या लोकांना कोरोनाचा गंभीर संसर्ग झाला होता आणि उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं असेल हा धोका चौपट असू शकतो. मात्र हा रिसर्च जेव्हा करण्यात आला तेव्हा कोरोनाची लस उपलब्ध नव्हती.
6 / 10
कोरोना लसीनंतरही कोरोनाचे दीर्घकालीन परिणाम शरीरावर काय होतील, याबद्दल तज्ज्ञांमध्ये गंभीर चिंता आहे. युनिव्हर्सिटी ऑफ रीडिंगच्या प्रोफेसर एंजेला क्लर्क यांनी याबाबत माहिती दिली.
7 / 10
एंजेला क्लर्क यांच्या म्हणण्यानुसार, 'हृदय स्वतःला रिपेयर करू शकत नाही, त्यामुळे एकदा नुकसान झाल्यानंतर ते ठिक करणं जवळजवळ अशक्य आहे. हृदय हा एक मजबूत अवयव आहे, जोपर्यंत त्याचं कार्य बिघडत नाही तोपर्यंत कोणताही संकेत देत नाही.
8 / 10
कोरोना व्हायरसचा हृदयावर अनेक प्रकारे परिणाम होऊ शकतो. हा व्हायरस रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर परिणाम करू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.
9 / 10
मायोकार्डिटिस म्हणजेच हृदयाची जळजळ देखील काही प्रकरणांमध्ये आढळून आली आहे, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका हा वाढू शकतो.
10 / 10
कोरोना संसर्गाची बहुतेक प्रकरणे सौम्य असतात आणि त्यामुळे दीर्घकालीन समस्या उद्भवत नाहीत. मात्र हृदय निरोगी ठेवण्यासाठी आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याचा सल्ला क्लर्क यांनी दिला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHeart Attackहृदयविकाराचा झटकाHeart DiseaseहृदयरोगHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य