Corona Virus pharma companies to be launch antiviral pills or covid pills
Corona Virus: कामाची बातमी! लसीनंतर आता येतेय 'अँटीव्हायरल गोळी'; जाणून घ्या, कोरोनावर किती प्रभावी By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 5:10 PM1 / 9कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातले आगे. अशात लस घेणे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. यामुळे, कोरोनाला मोठ्या प्रमाणावर रोखण्यात मदत होते. एवढेच नाही तर, लसीने रूग्णांची रुग्णालयात भरती होण्याची शक्यताही कमी केली असल्याचे लक्षात आले आहे. (Corona Virus pharma companies to be launch antiviral pills or covid pills)2 / 9खरे तर, कोरोनावर अद्याप कायमस्वरूपी उपचार नाही. पण, वैज्ञानीक आणि तज्ज्ञ वैद्यकीय व्यवसायिक या साथीच्या रोगाला आळा घालण्यासाठी विविध प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करत आहेत.3 / 9माध्यमांतील वृत्तांनुसार, फार्मा कंपन्या आता अँटीव्हायरल ओरल पिल्सचे (गोळ्या) उत्पादन करत आहेत. सांगण्यात येते, की यांच्या सहाय्याने कोरोनाची लक्षणे आणि धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. तर जाणून घेऊयात, या अँटीव्हायरल गोळ्या कोरोनाविरूद्ध किती प्रभावी ठरू शकतात आणि त्या केव्हापर्यंत उपलब्ध होतील.4 / 9अँटीव्हायरल पिल्स काय आहेत? टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, इतर अँटीव्हायरल औषधांप्रमाणेच, कोरोनाची गोळीही व्हायरसला आळा घालणे आणि त्याची वाढण्याची क्षमता कमी करण्यासाठी काम करेल. लस व्हायरसला शरीरात प्रवेश करण्यापासून रोखते. तर अँटीव्हायरल गोळ्या व्हायरसचा संक्रमणानंतरचा धोका रोखतील. 5 / 9वृत्तानुसार, कोरोना पिल्स एक अँटीव्हायरल औषध आहे. हे औषध कोरोना पॉझिटिव्ह लोक घेऊ शकतील. असेही बोलले जाते की, या गोळ्यांमुळे लोकांना आपल्या लक्षणांवर घरच्या घरीच उपचार करणे आणि लक्षणे अधिक वाढण्यापासून रोखण्यासाठी मदत मिळू शकते. 6 / 9तसेच, हे अँटीव्हायरल औषध लक्षणे सामान्य अथवा हलके असल्यास काही दिवसांतच व्हायरस प्रभाव शून्य करण्यासही मदत करेल, 7 / 9कोरोना लसीच्या तुलनेत कशी वेगळी आहे कोरोना गोळी - कोरोना लस व्हायरसचा संसर्ग होऊ नये, यासाठी सुरक्षितता प्रदान करते. तर अँटीव्हायरल औषध कोरोनाचा संसर्ग वाढण्यापासून रोखण्यासाठी मदत करू शकते. सध्या, फायझर, मर्क आणि जपानी कंपनी शिओनोगी कोरोना गोळी विकसित करत आहेत.8 / 9कधीपर्यंत येऊ शकते कोरोना गोळी - अमेरिकन कंपनी मर्कला आधीच ओरल अँटीव्हायरल औषध मोलनूपीरावीरसाठी एफडीएची मान्यता मिळाली आहे आणि अमेरिकेत एक सौदाही करण्यात आला आहे. फायझरच्या प्रायोगिक औषधांची चाचणी अद्याप सुरू आहे.9 / 9वृतानुसार, या गोळ्या याच वर्षी बाजारात लॉन्च होऊ शकतात. जपानच्या फार्मा कंपनीनेही नुकतेच वन-ए-डे पिलवर क्लिनिकल ट्रायल सुरू केली आहे. मात्र, हे अद्याप सुरुवातीच्याच टप्प्यावर आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications