Corona Virus positive patients at higher risk of heart attack after 18 months
Corona Virus : कोरोना पाठ सोडेना... बरं झाल्यावरही 18 महिने मृत्यूचा धोका; रिसर्चमधून धडकी भरवणारा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 12:36 PM1 / 12कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती आहे. सध्या कोरोनाने चीनमध्ये प्रचंड हाहाकार माजवला आहे. दुसऱ्या लाटेत कोरोनाचा भारतावर वाईट परिणाम झाला. शास्त्रज्ञ कोरोनाबाबत नवनवीन संशोधन करत आहेत आणि नवनवीन सातत्याने गोष्टी समोर येत आहेत.2 / 12एका नवीन संशोधनानुसार, काही रुग्ण जे कोरोना पॉझिटिव्ह आहेत त्यांना पोस्ट कोविडमध्ये देखील समस्या येऊ शकतात. कोरोना व्हायरसने शरीरावर खोलवर परिणाम केला आहे, ज्यापासून ते लवकर बरे होणे शक्य नाही. 3 / 12विशेष म्हणजे पोस्ट कोविडमुळे अडचणीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. नवीन संशोधनात असे आढळून आले आहे की कोविड-19 रुग्णांमध्ये संसर्ग झाल्यानंतर किमान 18 महिन्यांपर्यंत मृत्यूचा धोका वाढतो. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न हे केले जात आहेत. 4 / 12याआधीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये साथीच्या आजारातून बरे होऊनही लोकांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्यांसाठी हा अहवाल चिंताजनक आहे. 5 / 12शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, कोरोनाचा व्हायरसचा प्रभाव सुमारे अठरा महिने शरीरावर पडतो. दरम्यान, संधी मिळताच तो शरीरावर हल्ला करतो, त्यात जीवही जाऊ शकतो. युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजीच्या जर्नल कार्डिओव्हस्कुलर रिसर्चमध्ये प्रकाशित झालेल्या सुमारे 1 लाख 60 हजार लोकांवर केलेल्या अभ्यासानंतर हे आढळून आले आहे.6 / 12जे लोक कोरोनाचे बळी ठरले आहेत त्यांना सामान्य लोकांपेक्षा हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये मृत्यूचा धोका वाढतो असं त्यात म्हटलं आहे. हाँगकाँग विद्यापीठाचे प्रोफेसर इयान सीके वोंग यांनी म्हटले आहे की कोविड-19 च्या रूग्णांवर सुमारे एक वर्ष योग्यरित्या निरीक्षण केले पाहिजे. 7 / 12कोविड-19 रूग्णांचा संसर्गाच्या पहिल्या तीन आठवड्यांत मृत्यू होण्याची शक्यता संसर्ग न झालेल्या व्यक्तींपेक्षा 81 पट जास्त असते आणि 18 महिन्यांनंतर पाचपट जास्त आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 8 / 12जगभरात हाहाकार माजवणारा XBB.1.5 हा नवा व्हेरिएंट इतर प्रकारांपेक्षा लसीकरण केलेल्या लोकांवर आणि कोरोनाची लागण झालेल्या लोकांवर अधिक परिणाम करत आहे. एका नव्या रिसर्चमध्ये हा दावा करण्यात आला आहे.9 / 12वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने दिलेल्या माहितीनुसार, अलीकडेच 38 देशांमध्ये XBB.1.5 प्रकाराची प्रकरणे आढळून आली आहेत, ज्यामध्ये अमेरिकेतील 82 टक्के कोरोना प्रकरणांसाठी फक्त हा व्हेरिएंट जबाबदार आहे.10 / 12ब्रिटनमधील आठ टक्के आणि डेन्मार्कमधील दोन टक्के कोरोना केसेस या व्हेरिएंटमुळे आहेत. रिसर्चनुसार, या व्हेरिएंटमुळे लसीकरण झालेल्या किंवा यापूर्वी कोरोना झालेल्या लोकांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे.11 / 12XBB.1.5 स्ट्रेन Omicron XBB व्हेरिएंटच्या कुटुंबातील सदस्य आहे, जो Omicron BA.2.10.1 आणि BA.2.75 सब-व्हेरिएंट्सचं रिकॉम्बिनंट आहेत. अमेरिकेमध्ये 44 टक्के कोरोना प्रकरणांसाठी XBB आणि XBB.1.5 जबाबदार आहेत.12 / 12NYC डिपार्टमेंट ऑफ हेल्थ अँड मेंटल हायजीनने केलेल्या एका रिसर्चमध्ये असे आढळून आले आहे की, XBB.1.5 हा COVID-19 चा सर्वात वेगाने पसरणारा व्हेरिएंट आहे ज्याबद्दल आपल्याला माहिती आहे आणि इतर व्हेरिएंटमध्ये कोरोनाची लसीकरण झालेल्यांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे किंवा ज्यांना यापूर्वी कोरोना झाला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications