शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : टेन्शन वाढलं! "लाँग कोविड ठरू शकतो 'फेस ब्लाइंडनेस'चं कारण"; रिसर्चमध्ये धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 12:39 PM

1 / 12
देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. पुन्हा एकदा वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. संशोधनातून सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे.
2 / 12
धडकी भरवणारी अशीच माहिती आता मिळत आहे. कोरोनावरील एका अभ्यासानुसार, दीर्घकाळापर्यंत कोविड संसर्गामुळे काही लोकांमध्ये प्रोसोपॅग्नोसिया (Prosopagnosia) होऊ शकतो, ज्याला सामान्यतः फेस ब्लाइंडनेस म्हणून ओळखले जाते.
3 / 12
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स अँड स्ट्रोकने फेस ब्लाइंडनेसला चेहेरा ओळखण्यास असमर्थतेमुळे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर असं म्हटलं आहे. कॉर्टेक्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, कोविडच्या लक्षणांनंतर, काही लोकांना चेहरे ओळखण्यात आणि नेव्हिगेशनसंबंधी समस्या असू शकतात.
4 / 12
मार्च 2020 मध्ये कोविडची लागण झालेल्या एनी नावाच्या 28 वर्षीय महिलेवर हा अभ्यास केंद्रित होता. याआधी एनीला चेहरे ओळखण्यात कोणतीही अडचण आली नव्हती, परंतु व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर दोन महिन्यांनी तिला जवळच्या कुटुंबातील सदस्यांनाही ओळखणे कठीण झाले.
5 / 12
एका प्रसंगी, एनी म्हणाली की जेव्हा ते एका रेस्टॉरंटमधून गेले तेव्हा तिला तिच्या वडिलांचा चेहरा ओळखता आला नाही. अनोळखी व्यक्तीच्या चेहऱ्यावरून माझ्या वडिलांचा आवाज येत असल्याचे तिला वाटत असल्याचे एनीने सांगितले.
6 / 12
एनीने संशोधकांना सांगितले की ती आता ओळखीसाठी लोकांच्या आवाजावर अवलंबून आहे. एनीला कोविड संसर्गानंतर 'नॅव्हिगेशनल डेफिसिट (दिशेची जाणीव नसणे)' ची समस्या देखील होती. यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
7 / 12
भारतासह देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा पसरू लागला आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांचा आलेख पुन्हा एकदा वाढत आहे. दिल्ली, महाराष्ट्र आणि गुजरातसह देशाच्या इतर भागातही कोरोनाची प्रकरणे आता वैद्यकीय तज्ज्ञांचे टेन्शन वाढवत आहेत.
8 / 12
जर आपण जागतिक स्तरावर कोरोनाबद्दल बोललो, तर 24 तासांत जगभरात कोरोनाचे 66 हजार रुग्ण आढळले आहेत. रविवारी राजधानी दिल्लीत कोरोनाचे 72 नवीन रुग्ण आढळले आहेत. यासह पॉझिटिव्हिटी रेट 3.95 टक्के झाला आहे.
9 / 12
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एकीकडे H3N2 व्हायरससोबतच दिल्लीत कोरोनाच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. दिल्लीतील कोरोना पॉझिटिव्ह दर शनिवारी 3.52 टक्के होता. महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रकरणांमुळे तणाव वाढत आहे.
10 / 12
भारतात सुमारे चार महिन्यांनंतर कोरोनाची प्रकरणे वाढू लागली आहेत, शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की कोविड-19 XBB प्रकाराचा वंशज XBB 1.16, गेल्या काही दिवसांत भारतात कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये अलीकडील वाढीमागे असू शकतो.
11 / 12
भारताव्यतिरिक्त, हा प्रकार चीन, सिंगापूर, युनायटेड स्टेट्स आणि इतरांसह विविध देशांमध्ये देखील वेगाने पसरला आहे. एका अहवालानुसार, कोविड-19 च्या या प्रकारामुळे नवीन लाट येण्याची शक्यता वाढू शकते.
12 / 12
कोरोना प्रकारांवर नजर ठेवणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठानुसार, भारतात सध्या कोरोनाच्या XBB 1.16 प्रकारातील सर्वाधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. कोरोनाच्या संकटात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या