शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus: हलक्यात घेऊ नका! कोरोना मोठ्यांपासून छोट्यांकडे कायमचा वळणार; शास्त्रज्ञांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 6:17 PM

1 / 10
जगभरात कोरोनाने (Corona Virus) कहर मांडला असून तिसरी, चौथी लाट येणार असल्याचे इशारे वेगवेगळे शास्त्रज्ञ, संस्था, डॉक्टर देत आहेत. परंतू, गुरुवारी प्रकाशित झालेल्या एका मॉडेलिंग अभ्यासानुसार कोरोना व्हायरस भविष्यात सामान्य सर्दी, ताप यासारख्या व्हायरससारखा रुपांतरीत होऊ शकतो. (Corona virus shift elder people to children's possible)
2 / 10
धक्कादायक बाब म्हणजे व्हायरसचे हे बदललेले रुप छोट्या मुलांना सर्वाधिक प्रभावित करेल, या बालकांना अद्याप कोरोना लस दिलेली नाही, असे म्हटल्याने काळजी वाढली आहे.
3 / 10
या अभ्यासामध्ये सहभागी यूएस-नॉर्वेजियन टीमला आढळले की, COVID-19 ची गंभीरता सामान्यपणे लहान मुलांमध्ये कमी आहे. यामुळे या व्हायरसचा धोकादेखील कमी असेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
4 / 10
ज्या देशांमध्ये कोरोनाचे लसीकरण वेगाने होत आहे, त्या देशांत कोरोनाचे संक्रमण देखील वेगाने होत आहे. अमेरिकेची आरोग्य संस्थेने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील चार आठवड्यांत अमेरिकेत कोरोनाचे रुग्ण हॉस्पिटलाईज होणे आणि मृत्यूंच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते.
5 / 10
नॉर्वेच्या ओस्लो विश्वविद्यालयाचे ओटार ब्योर्नस्टेड यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस संक्रमनानंतर वेगाने त्याचे गंभीर परिणाम आणि वयानुसार घातकी झाल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
6 / 10
आमचे मॉडेलिंग अंदाज सांगतात की, संक्रमनाचा प्रवास हा मोठ्यांकडून लहान मुलांकडे होणार आहे. कारण मोठ्यांनी लसीकरण केल्याने किंवा कोरोना संक्रमित झाल्याने त्यांच्यात इम्युनिटी पावर वाढली आहे. यामुळे त्यांना झालेला कोरोना आता मुलांमध्ये पसरण्याचा धोका आहे.
7 / 10
साइंस एडव्हांसेज जर्नलमध्ये हा अहवाल प्रकाशित झाला आहे. या प्रकारचे बदल हे कोरोना व्हायरस आणि इन्फ्लूएंजा व्हायरसमध्ये दिसले आहेत. जे वेगाने पसरले आणि जगभरात कायमचे आजार बनले.
8 / 10
1889-1890 महामारीने रशियामध्ये 70 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना प्रभावित केले होते. या HCoV-OC43 विषाणूला आशियाई किंवा रुसी फ्ल्यू म्हणून ओळखले जाते. यावेळी 10 लाख लोकांचा मृत्यू झाला होता.
9 / 10
आता तो व्हायरस सामान्य सर्दी, वारंवार संक्रमित करणारा सामान्य व्हायरस बनला आहे. तो 7 ते 12 महिन्यांच्या बालकांना संक्रमित करतो. तसाच कोरोना देखील वागण्याची शक्यता आहे.
10 / 10
ब्योर्नस्टैड यांनी इशारा देतानाच सावधही केले आहे. जर मोठ्या व्यक्तींमध्ये कोरोनाचे पुन्हा संक्रमण झाले आणि त्यांची प्रतिकार शक्ती बाधित झाली तर या आजाराचे ओझे वाढणार आहे. जर वयस्कर लोक गेल्या वेळी कोरोनाच्या संपर्कात आली असतील तर आजाराची गंभीरता कमी होईल.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAmericaअमेरिका