शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : कोरोना रिटर्न! लाँग कोविडने वाढवलं टेन्शन, शरीरात दिसतात 'ही' 4 लक्षणं; 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 5:35 PM

1 / 10
कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर लाँग कोविडचा त्रास होत आहे. 65 वर्षांखालील प्रत्येक पाच व्यक्तींपैकी एकाला लाँग कोविडची समस्या आहे. जेव्हा एखादी व्यक्ती संसर्गातून बरी झाल्यानंतर चार आठवड्यांपेक्षा जास्त काळानंतरही शरीरात कोविडची लक्षणे दिसून येतात, तेव्हा लाँग कोविड सिंड्रोम त्या व्यक्तीला होतो.
2 / 10
काही लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दीर्घकाळ टिकून राहतात आणि सहा महिन्यांपर्यंतही शरीरात राहू शकतात. यामध्ये कोविडचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही त्याची लक्षणे शरीरात दिसतात व कोविडचा प्रभाव संपत नाही.आता एका संशोधनात असे आढळून आले आहे की लाँग कोविडमुळे शरीराचे चार प्रकारे नुकसान होते.
3 / 10
नेचर मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात संशोधकांनी लाँग कोविडने ग्रस्त असलेल्या सुमारे 35,000 रुग्णांवर संशोधन केले. संशोधकांनी एक अल्गोरिदम वापरला ज्याने 137 वेगवेगळी लक्षणे पाहिली आणि नंतर रुग्णांमध्ये चार मुख्य लक्षणे नोंदवण्यात आली.
4 / 10
संशोधकांनी 4 मुख्य समस्या सांगितल्या. यामध्ये कार्डिॲक आणि रीनल (किडनी) सिस्टीम प्रभावित होणे. श्वसन संस्था, झोप यांच्यावर परिणाम होणे. मस्कुलोस्केलेटल आणि न्यूरोलॉकल डिऑर्डर आणि पचनासंबंधित समस्या.
5 / 10
प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी लक्षणे दिसू शकतात. या संशोधनात असे आढळून आले आहे की लाँग कोविडमुळे शरीराच्या जवळजवळ प्रत्येक अवयवामध्ये समस्या होते. वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये त्याची वेगेवगळी लक्षणे दिसू शकतात.
6 / 10
काही प्रकरणांमध्ये, लाँग कोविड हा गंभीर स्वरूप धारण करू शकतो आणि रुग्णाला पुन्हा रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकते. त्यामुळे डॉक्टरांना या परिस्थितीचे अचूक निदान करणे आणि त्यावर उपचार करणे कठीण होऊ शकते.
7 / 10
संशोधनात असे दिसून आले आहे की कोरोनानंतर 34 टक्के लोक लाँग कोविडने ग्रस्त आहेत, कोकार्डिॲक आणि रीनल (किडनी) प्रणालीवर परिणाम करणारा उपप्रकार सर्वात सामान्य होता. तर 33% रुग्णांना श्वसनाची समस्या, चिंता, दीर्घकाळापर्यंत डोकेदुखी जाणवणे आणि निद्रानाशाचा त्रास जाणवला.
8 / 10
23% रुग्णांमध्ये मस्कुलोस्केलेटल आणि मज्जासंस्थेशी संबंधित लक्षणे आढळून आली आहेत. कोविडमधून बऱ्या झालेल्या काही रुग्णांना पचनासंबंधी समस्याही जाणवल्या. सर्वात अधिक लोकांना कार्डिॲक आणि रीनल प्रॉब्लेमचा सामना करावा लागत आहे.
9 / 10
हृदय आणि किडनी आजाराच्या रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर आरोग्याची योग्य रितीने काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. नियमित शरीराची तपासणी करावी. आहार आणि जीवनशैली योग्य ठेवावी. मानसिक ताण घेऊ नये. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
10 / 10
देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स