शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोना रुग्णांच्या 'या' २ उपचार पद्धतींबाबत आरोग्यमंत्रालयानं दिली धोक्याची सूचना

By manali.bagul | Published: September 29, 2020 11:41 AM

1 / 9
गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात हाहाकार पसरवला आहे. प्लाज्मा थेरेपी आणि रेमडेसिविर या औषधांचा वापर कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी केला जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या औषधांच्या वापराबाबत धोक्याची सुचना दिली आहे. त्यांनी सांगितले की, सध्या ही 'इनवेस्टिगेशनल थेरेपी' असून या उपचारांच्या वापराबाबत अधिक माहिती मिळवणं सुरू आहे.
2 / 9
एंटी व्हायरल ड्रग रेमडेसिविर आणि प्लाज्मा थेरेपीचा वापर गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी केला जातो. मुंबई आणि दिल्लीमध्ये रुग्णसंख्या जास्त असल्यामुळे या औषधांचा वापर केला जात आहे. आतापर्यंत देशात कोरोनाबाधितांची संख्या ६० लाखांवर पोहोचली आहे.
3 / 9
याआधीही दिल्ली सरकारच्या दोन संक्रमित मंत्र्याच्या उपचारासाठी प्लाज्मा थेरेपीचा वापर करण्यात आला होता. या उपचारांचे सकारात्मक परिणाम दिसून आले होते.
4 / 9
होते. डॉ. हर्षवर्धन यांच्या व्यतिरिक्त इतर रुग्णालयातही इन्वेस्टिगेशनल थेरपीच्या रुटीनसाठी या औषधांचा वापर न करण्याचा सल्ला देण्यात आला होता.
5 / 9
दरम्यान काही दिवसांपूर्वी आयसीएमआरकडून करण्यात आलेल्या रिसर्चनुसार प्लाज्मा थेरेपी कोरोना रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी कमी प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले होते.
6 / 9
दिल्लीमध्ये हजारो लोकांना प्लाज्मा थेरेपीच्या वापरानं फायदा झाला असून अनेक रुग्णांचे जीव वाचवण्याच यश आले असल्याचा दावा तज्ज्ञांकडून करण्यात आला होता.
7 / 9
. या थेरेपीमुळे रुग्णांवर कोणतेही साईड इफेक्ट्स दिसून आले नव्हते. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या उपचारांसाठी रुग्णाला वेळेत उपचार मिळाले तरच प्लाज्मा थेरेपी परिणामकारक ठरू शकते.
8 / 9
किडनी, लिव्हर किंवा इतर गंभीर समस्या असलेल्या रुग्णांना रेमडेसिविर दिल्याने धोका वाढू शकतो.
9 / 9
किडनी, लिव्हर किंवा इतर गंभीर समस्या असलेल्या रुग्णांना रेमडेसिविर दिल्याने धोका वाढू शकतो.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य