शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आता WHO प्राचीन औषधांमध्ये शोधणार कोरोनाचा इलाज! हर्बल मेडिसिनच्या ट्रायलचे केले समर्थन

By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 20, 2020 9:39 PM

1 / 10
कोरोना व्हायरस महामारीवर मात करण्यासाठी जगभरात औषधी अथवा लशीवर कंबर कसून काम सुरू आहे. यातच आता जागतीक आरोग्य संघटनेने (WHO) पहिल्यांदाच कोरोनाच्या उपचारासाठी आयुर्वेदिक औषधांमध्ये (Herbal medicine) शक्यता शोधण्याचा प्रयत्न केला आहे. WHOने शनिवारी कोरोनावरील उपचारासाठी आफ्रिकेतील आयुर्वेदिक औषधीच्या टेस्टिंग प्रोटोकॉलचे समर्थन केले आहे.
2 / 10
आता WHOने कोरोनाचा सामना करण्यासाठी प्राचीन औषधांच्या वापराचा मुद्दा उचलला आहे. पूर्व आफ्रिकेतील देश मदागास्करचे राष्ट्रपती अँड्री राजोएलिना यांनी मलेरियावरील उपचारात कामी येणारी एक औषधी वनस्पती आर्टमिसियापासून तयार केलेले पेय प्रोमोट केल्यानंतर साधारणपणे एक महिन्यांनी WHOने, हा विचार केला आहे.
3 / 10
अँड्री राजोएलिना ज्या कोविड ऑर्गेनिक्स ड्रिंकला (Covid organic drink) प्रमोट करत आहेत, त्याला CVO देखील म्हटले जाते.
4 / 10
राजोएलिना यांनी हे औषध कोविड-19च्या उपचारासाठी प्रभावी असल्याचे म्हटले आहे.
5 / 10
हे ड्रिंक आता मदागास्करशिवाय आफ्रिकेतील इतर देशांपर्यंतही पोहोचले आहे.
6 / 10
WHOमधील तज्ज्ञांनी आणि दोन इतर संस्थांमधील सहकाऱ्यांनी आफ्रिकेतील हर्बल मेडिसिनच्या क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यासाठी या प्रोटोकॉलचे समर्थन केले आहे.
7 / 10
तिसऱ्या टप्प्यावरील ट्रायल, या नव्या मेडिकल प्रोडक्टच्या प्रभावाचे आणि सुरक्षिततेचे परीक्षण करण्यासाठी अत्यंत निर्णायक ठरेल.
8 / 10
WHOचे विभागीय संचालक प्रॉस्पर टुमुसीम यांनी सांगितले, 'जर हे प्राचीन मेडिकल प्रोडक्ट सुरक्षितता, प्रभाव आणि गुणवत्तेच्या निकषांवर योग्य ठरले, तर WHO याच्या फास्ट ट्रॅक आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादनासाठी शिफास करेल.'
9 / 10
आफ्रिका सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन आणि आफ्रिकन युनियन कमिशन फॉर सोशल अफेअर यात WHOचे सहकारी आहेत.
10 / 10
टुमुसीम म्हणाले, 'पश्चिम आफ्रिकेत इबोलाप्रमाणेच, कोविड-19 (Covid-19)पासून बचावासाठी चांगल्या दर्जाच्या हेल्थ सिस्टमची आवश्यकता असल्याचे निदर्शणास आले आहे. हे पाहता, प्राचीन औषधींबरोबरच मोठ्या प्रमाणावर संशोधन आणि डेव्हलपमेन्ट प्रोग्रॅमला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या