शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Corona Virus : भारतात दिवाळीनंतर कोरोनाची तिसरी लाट येईल का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2021 11:04 AM

1 / 10
मार्च-एप्रिलमध्ये आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता धनत्रयोदशी, दिवाळी आणि छठपूजा हे सण तोंडावर आहोत. याच सणांच्या पार्श्वभूमीवर देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
2 / 10
दिल्लीसह इतर राज्यांमध्ये पालकही मुलांना शाळेत पाठवण्यास लेखी संमती देत ​​नाहीत. मात्र, वायरोलॉजिस्टचे याबाबत वेगळे मत आहे. यासंदर्भातील वृत्त आजतकने दिले आहे. नॅशनल व्हेक्टर बोर्न डिसीज कंट्रोल प्रोग्रामचे सल्लागार वायरोलॉजिस्ट डॉ. अक्षय धारीवाल म्हणाले की, सणासुदीच्या काळातही लोकांनी कोरोनाबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे.
3 / 10
कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला आहे, असे सध्या तरी म्हणता येणार नाही. धोका अजून संपलेला नाही, त्यामुळे धनत्रयोदशीसारख्या सणांना गर्दी जमवू नका. लोकांनी कोरोनाचे योग्य पालन करणे खूप महत्वाचे आहे. घराबाहेर पडल्यास नेहमी मास्क लावणे गरजेचे आहे, असे वायरलॉजिस्ट अक्षय धारीवाल यांनी सांगितले.
4 / 10
आता बरेच लोक मास्कबाबत बेफिकीर असल्याचे दिसून येत आहेत. परंतु कोरोनापासून संरक्षणाच्या पद्धती पूर्णपणे सोडून पूर्वीप्रमाणे राहण्याची वेळ अद्याप आलेली नाही. आता कोरोनानंतर ज्याप्रकारे नवीन सामान्य वातावरण तयार झाले आहे, त्याच प्रकारे आपले वर्तन तयार केले पाहिजे, असे वायरलॉजिस्ट अक्षय धारीवाल म्हणाले.
5 / 10
याचबरोबर, वायरलॉजिस्ट अक्षय धारीवाल यांनी कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेबाबत सांगितले की, आता भारतात तिसरी लाट येण्याचा धोका नाही. कोरोनाची प्रकरणे येत राहतील, पण आता दुसऱ्या लाटेप्रमाणे कोरोना भारतात कहर करणार नाही, यामागे लसीकरण आणि हर्ड इम्युनिटी हे प्रमुख कारण असल्याचे त्याचे म्हणणे आहे. तसेच, आतापर्यंत झालेल्या सेरो सर्वेक्षणात हे देखील समोर आले आहे की, देशात मोठ्या प्रमाणात हर्ड इम्युनिटी निर्माण झाली आहे, असे वायरलॉजिस्ट अक्षय धारीवाल यांनी सांगितले.
6 / 10
देशात 100 कोटी लोकांना लसीकरण करण्यात आले आहे. याशिवाय तज्ज्ञ मुलांची काळजी करू नका असे आधीच सांगत आहेत. वायरलॉजिस्ट अक्षय धारीवाल म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा असा कोणताही धोका नाही. पालक निर्भयपणे मुलांना शाळेत पाठवू शकतात. सणानंतर परिस्थिती बिघडण्याची अपेक्षा नगण्य असल्याने पालक सणानंतर संमती देऊ शकतात.
7 / 10
पब्लिक पॉलिसी व हेल्थ एक्सपर्ट डॉ. चंद्रकांत लहरिया यांनीही या विषयावर चर्चा केली. ते म्हणाले की, आता पालकांना घाबरण्याची गरज नाही. सणानंतर कोरोनाचे रुग्ण वाढले तरी राष्ट्रीय स्तरावर कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका नगण्य आहे. असे असले तरी मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग खूपच कमी आहे. संसर्ग झाला तरी त्याचा मुलांवर दीर्घकाळ काहीही परिणाम होणार नाही.
8 / 10
डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणाले की, नुकत्याच झालेल्या सेरो सर्वेक्षणात असे दिसून आले की जूनपर्यंत 67.6% अँटीबॉडीज बनल्या होत्या. सेरो सर्वेक्षणात हे देखील दिसून आले होते की मुलांमध्ये अँटीबॉडी देखील तयार झाल्या होत्या, त्या प्रौढांच्या वेगाने तयार झाल्या होत्या. एवढेच नाही तर देशातील 100 कोटी लोकांना कोरोनाचा डोस मिळाला आहे.
9 / 10
आता सणांआधी आलेले सेरो सर्वेक्षण सांगत आहे की लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी ९० टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. या सर्व गोष्टी पाहता पहिल्या आणि दुसऱ्या लाटेसारखी मोठी लाट येण्याची शक्यता नाही. मुलांना पूर्वीही कमी गंभीर आजार होते. लहान मुलांमध्ये संसर्ग झाला तरी गंभीर आजार होत नाही, असे डॉ. चंद्रकांत लहरिया यांनी सांगितले.
10 / 10
पुढची लाट आली तरी पटसंख्या कमीच राहील, म्हणून मुलांच्या शाळा उघडल्या पाहिजेत. याबाबत पालकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, असे डॉ. चंद्रकांत लहरिया सांगतात. तसेच, डेन्मार्क-स्वीडन इत्यादी देशांनी शाळा बंद केल्या नाहीत, आता अमेरिकेतील लोकांनी मुलांना शाळेत पाठवायला सुरुवात केली आहे, असे डॉ. चंद्रकांत लहरिया म्हणाले.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस