corona wreaked havoc in china only 3 days of medical supplies left people imprisoned in homes
Coronavirus : 'या' ठिकाणी कोरोनाचा कहर; फक्त 3 दिवसांचा वैद्यकीय साठा शिल्लक! By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 12:07 PM1 / 9नवी दिल्ली : चीनमध्ये सध्या कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. 2020 नंतर सर्वात वाईट परिस्थिती असल्याचे म्हटले जात आहे. तेथे गेल्या काही आठवड्यांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढले आहेत. 2 / 9अशा परिस्थितीत भारतातही चिंता वाढू लागली आहे. कोरोनाची प्रकरणे पाहता चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे. येत्या आठवड्यात चीनच्या आरोग्य सेवेवर ताण येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.3 / 9कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीनमधील अनेक शहरांमध्ये तात्पुरती रुग्णालये तयार करण्यात आली आहेत. दरम्यान, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग म्हणाले की, देश 'झिरो कोविड पॉलिसी'सोबत राहील. माहितीनुसार, गेल्या 10 आठवड्यांत चीनमध्ये 14000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 4 / 9चीनमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची सर्वाधिक प्रकरणे आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. चीनच्या या लॉकडाऊनचा देशाच्या अर्थव्यवस्थेवरही वाईट परिणाम होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.5 / 9मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनमध्ये कोरोना टेस्टिंगवरून अनेक ठिकाणी वाद-विवाद सुरू आहे. याशिवाय चीनच्या कठोर 'झिरो कोविड पॉलिसी' अंतर्गत लोकांना क्वारंटाईन केले जात आहे. 6 / 9चीनमध्ये कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या जिलिनमध्ये रुग्णालयांमध्ये रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी जागा कमी पडत आहे. एका स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, येथे कोरोना रोखण्यासाठी केवळ 2-3 दिवसांचा वैद्यकीय पुरवठा (मेडिकल सप्लाय) उपलब्ध आहे.7 / 9चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनमुळे बरेच लोक आपापल्या घरात कैद झाले आहेत. ज्या प्रांतात कोरोनाचे रुग्ण जास्त येत आहेत, त्या प्रांतात लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. आतापर्यंत चीनमधील 10 शहरांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 8 / 9तसेच, आरोग्य अधिकार्यांनी इशारा दिला आहे की, आणखी कडक निर्बंध लादले जातील. ऑक्सफर्ड विद्यापीठातील एपिडेमियोलॉजीचे प्रोफेसर चेन झेंगमिन म्हणाले की, येत्या काही दिवसांत निर्बंध आणखी कडक केले जातील, जे संसर्ग थांबवण्यासाठी पुरेसे आहेत की नाही, हे समजून येईल. 9 / 9वाढत्या कोरोना प्रकरणांमध्ये चीनमध्ये वृद्धांना बूस्टर डोस देण्यात आलेला नाही, असे सांगितले जात आहे. याशिवाय, शेन्झेनमध्ये लोकांना कठोरपणे सांगण्यात आले आहे की घरातील एकच सदस्य घरातील जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी घराबाहेर पडेल. आणखी वाचा Subscribe to Notifications