शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVaccine : सावधान! कोरोनाची लस घेण्याआधी चुकूनही खाऊ नका हे २ पदार्थ; अन्यथा लस घेऊनही होणार नाही उपयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 12:30 PM

1 / 10
आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की प्रिजर्वेटिव्ह अन्नपदार्थ आपल्या शरीरासाठी चांगले नसतात. दरम्यान नवीन अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार लस घेण्याआधी काही पदार्थांचे सेवन टाळायला हवं तरच कोरोना व्हायरसपासून संरक्षण मिळू शकतं अन्यथा रोगप्रतिकारकशक्तीवर वाईट परिणाम होण्याची भीती असते.
2 / 10
हा अभ्यास अमेरिकेच्या एनवायरमेंटल वर्किंग ग्रुप कडून शेअर करण्यात आला आहे. तसंच इंटरनॅशनल जर्नल ऑफ इनवायरमेंटल रिसर्च एंड पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
3 / 10
या अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार प्रिजर्वेटिव्हज पदार्थामध्ये असलेले दोन केमिकल शरीरातील रोगप्रतिराकशक्ती खराब करतात. विशेष म्हणजे सर्वाधिक खाल्ल्या जात असलेल्या १ हजारांपेक्षा जास्त पदार्थांमध्ये हे केमिकल आढळून येतं. यातील केमिकल्सची नावं tert-butylhydroquinone (TBHQ) आणि per- and polyfluoroalkyl substances (PFAS) अशी आहेत.
4 / 10
TBHQ नावाच्या प्रिजर्वेटिव्हचा वापर अन्नाला दीर्घकाळ चांगले ठेवण्यासाठी केला जातो. संशोधकांना दिसून आले की TBHQ शरीरातील पेशींवर नकारात्मक परिणाम करतो. त्याचा थेट परिणाम रोगप्रतिकारकशक्तीवर होतो.
5 / 10
PFAS या प्रिजर्वेटिव्हचा वापर पॅकेजिंगसाठी केला जातो. त्यामळे पॅक्ड फूडमध्ये याचा सर्वाधिक वापर केला जातो परिणामी लोकांची रोगप्रतिराकशक्ती कमकुवत होते. यामुळे कॅन्सर, जन्माच्यावेळी वजन कमी असणं, कोलेस्ट्रॉल, वजन वाढणं या सारखे आजार होऊ शकतात. अमेरिकेच्या फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशननं लोकांना अशा पदार्थांपासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे.
6 / 10
कोरोनाकाळात इम्यून सिस्टिमला धोका पोहोचवणारे पदार्थ सध्या चितेंचा विषय ठरले आहेत. या माहामारीच्या आधी खाण्यापिण्याच्या पदार्थांकडे फारसं लक्ष दिलं जात नव्हतं. पण आता अधिक सावधगिरी बाळगावी लागणार आहे.
7 / 10
इतर अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार TBHQ केमिकल फ्लूच्या लसीचा परिणाम कमी करत होते. म्हणून कोरोनाच्या लसीबाबतही तज्ज्ञ चितेंत आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार आता हाय प्रिजर्वेटिव्हज आणि पॅक फूडचा आहारातील समावेश बंद करायला हवा.
8 / 10
साईड इफेक्ट्स पासून बचावासाठी काहीजण पेनकलर्स घेत आहेत. तज्ज्ञांच्या मते पेन किलरर्स जास्त खाणं शरीराासाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्यामुळे निष्कारण गोळ्या घेणं टाळायला हवं.
9 / 10
TBHQ आणि PFASफ्रोजन फूड, कँडी रेपर्स, पॉपकॉर्न बॅग्स, पिज्जा बॉक्स आणि फास्ट फूडच्या डब्यांमध्ये अशा प्रकारचे पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. म्हणून लस घेण्याआधी आणि नंतर काही महिने अशा प्रकारच्या पदार्थाचे सेवन करणं टाळायला हवं.
10 / 10
याशिवाय मद्यपान, धुम्रपान करू नये. अन्यथा लसीचा योग्य परिणाम दिसण्यात अडथळे येऊ शकतात. (Image Credit- Getty images)
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याExpert Opinionतज्ज्ञांचा सल्ला