CoronaVaccine News : 27 people who got covid-19 vaccine died india health ministry
चिंताजनक! भारतात कोरोनाची लस दिल्यानंतर २७ लोकांचा मृत्यू; आरोग्यमंत्रालयानं सांगितले की... By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 2:50 PM1 / 6भारतात कोरोनाची लस दिल्यानंतर 27 लोकांना मृत्यचा सामना करावा लागला आहे. एएनआयच्या रिपोर्टनुसार भारताच्या आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यानं याबाबत अधिक माहिती दिली आहे. 2 / 6मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या मृतांपैकी एकाचाही मृत्यू लस घेतल्यामुळे झालेला नाही. शनिवारी भारताच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात तीन लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लस देण्यात आली होती. आता आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार देशात लसीकरणामुळे गंभीर स्थितीत मृत्यू झाल्याचे समोर आलेले नाही. 3 / 6दरम्यान शनिवारी भारतात लसीचा दुसरा डोज देण्याच्या कामाला सुरूवात झाली. पहिली लस घेतल्यानंतर २८ दिवसांनंतर लोकांना लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. 4 / 6शनिवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत देशात कोरोनाचे एकूनण 80 लाख 52 हजार 452 लसी देण्यात आल्या आहेत. भारतात सीरम इंस्टिट्यूटकडून तयार केली जाणारी ऑक्सफोर्डची कोरोना लस आणि भारत बायोटेकच्या लसीचा वापर करण्यात येत आहे. 5 / 6भारतात एकूण कोरोनाच्या प्रकरणांची संख्या 10,880,603 वर गेली असून आकडेवारीनुसार देशारत कोरोनामुळे १५५,४४७ लोकांना मृत्यूचा सामना करावा लागला आहे. 6 / 6जगभरातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 107,778,443 वर गेला आहे. तर एकूण २३ लाख ६८ हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications