शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News : बापरे! कोरोनाच्या चौथ्या लाटेत 'हे' अजब लक्षण ठरतंय संकट; 'असे' संकेत दिसल्यास व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 5:54 PM

1 / 14
कोरोना व्हायरसचा कहर सातत्याने वाढत असून भारताव्यतिरिक्त जगभरातील अनेक देशांमध्ये कोविड-19 चे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. अमेरिका, चीन आणि युरोपातील काही देशांमध्ये सर्वाधिक प्रकरणे नोंदवली जात आहेत
2 / 14
भारतात गेल्या 15 दिवसांपासून रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ज्याकडे कोरोनाची चौथी लाट म्हणून पाहिलं जात आहे. अनेक देशांमध्ये, ओमायक्रॉनचे सब व्हेरिएंट BA.4 आणि BA.5 लोकांना झपाट्याने संक्रमित करत आहेत आणि त्याची प्रकरणे भारतातही पुष्टी झाली आहेत,
3 / 14
तज्ञांनी चौथ्या लहरीपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा चार कोटींवर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 13,086 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 24 जणांचा मृत्यू झाला आहे.
4 / 14
आतापर्यंत सर्दी आणि ताप ही कोरोनाची सामान्य लक्षणे मानली जात होती, परंतु कोविड-19 च्या चौथ्या लाटेत बरेच बदल झाले आहेत. कोरोनाच्या नव्या लाटेत रुग्णांमध्ये गंभीर लक्षणे दिसत नाहीत, मात्र असे असतानाही तज्ज्ञांनी लोकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.
5 / 14
कोरोनामधून बरे झाल्यानंतरही काही लक्षणे लोकांची पाठ सोडत नाहीत. अलीकडे, युनायटेड किंगडमच्या ZOE कोविड सिम्पटम्स एपने असे दर्शविले आहे की डोकेदुखी हे सर्वात मोठे लक्षण म्हणून उदयास आले आहे आणि सुमारे 69 टक्के लोकांना हे लक्षण दिसून आलं आहे.
6 / 14
ZOE कोविड सिम्पटम्स एपनुसार, कोरोनाची लागण झालेल्या 69 टक्के रुग्णांमध्ये डोकेदुखीची नोंद झाली आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची डोकेदुखी व्हायरसची लागण झाल्यानंतर सुरू होते आणि काही रुग्णांमध्ये ती बरी झाल्यानंतर बराच काळ टिकते.
7 / 14
दिलासा देणारी बाब आहे की अभ्यासात असे दिसून आले आहे की कोरोनामुळे होणारी डोकेदुखी कालांतराने हळूहळू कमी होते. डोकेदुखी ही एक सामान्य समस्या आहे आणि ती अनेक कारणांमुळे असू शकते, त्यामुळे लक्षात ठेवा की जर तुम्हाला डोकेदुखी होत असेल तर ते कोरोनामुळेच आहे असे नाही.
8 / 14
मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर जास्त वेळ काम करण्याबरोबरच उष्मा, तणाव, झोपेच्या पद्धतीत बदल, अन्न न खाणे, डिहायड्रेशन यामुळेही डोकेदुखी होऊ शकते. डोकेदुखीच्या लक्षणांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
9 / 14
सामान्यतः डोकेदुखी एक दिवस टिकते, परंतु कोरोनामुळे होणारी डोकेदुखी तीन दिवस किंवा त्याहून अधिक काळ टिकते, जी औषध घेतल्यानंतरही बरी होत नाही. डोकेदुखी हे कोरोनामुळे होते की अन्य काही कारणांमुळे ते त्याच्या लक्षणांवरून ओळखता येते.
10 / 14
डोकेदुखी सोबत ताप, सर्दी, खोकला, थकवा, घसा खवखवणे, नाक वाहणे, अंगदुखी, स्नायू व सांधेदुखी, वास आणि चव कमी होणे अशी लक्षणे असतील तर त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका. अशा प्रकारे लक्षणे दिसू लागल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
11 / 14
देशभरात वेगाने लसीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोना लस घेतली आहे. कोरोना व्हायरस आणि कोरोना लसीबाबत जगभरात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत.
12 / 14
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स), नवी दिल्लीच्या संशोधनात असे आढळून आले आहे की सहा महिन्यांनंतरही अँटी-कोरोना लसीचा मानवी शरीरावर तितकासा परिणाम होत नाही. त्याचा प्रभाव कमी होतो.
13 / 14
एम्सच्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, एका अभ्यासात असे समोर आले आहे की कोरानाच्या दोन्ही डोस घेतल्यानंतर, ही लस सुमारे दोन आठवडे ते दोन महिने ओमायक्रॉनपासून संरक्षण करण्यास मदत करते. या कालावधीत त्याचा प्रभाव 52.2 टक्क्यांपर्यंत टिकतो.
14 / 14
अभ्यासात असे दिसून आले की जसजसा वेळ जातो तसतसा लसीचा प्रभाव देखील कमी होतो. यामुळे, सहा महिन्यांनंतर, ही लस ओमायक्रॉनवर तितकी प्रभावी नाही. सहा महिन्यांनंतर, लसीचा कोणताही विशेष परिणाम आढळला नाही.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य