शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: भारतीयांच्या डीएनएमध्ये ही गोष्ट आहे खास, जिच्यासमोर कोरोनाही टेकतोय हात, तज्ज्ञांचा दावा

By बाळकृष्ण परब | Published: September 24, 2020 5:26 PM

1 / 10
भारतातील कोरोना संकट अजूनही कमी झालेलं नाही. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूबाबत भारतीयांना मोठा दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. भारतीयांच्या डीएनएमध्ये अमेरिका आणि युरोपिनयन लोकांच्या तुलनेत एक असा जिन अधिक प्रमाणात आहे. ज्यामुळे कोरोनाशी लढण्याची भारतीयांची क्षमता अधिक आहे. या जिनमुळेच भारतात कोरोनाबाधित रुग्णांचा रिकव्हरी रेट सर्वात चांगला आहे.
2 / 10
हा दावा बनारस हिंदू विद्यापीठाने केलेल्या संशोधनानंतर करण्यात आला आहे. संपूर्ण जगातील विविध ठिकाणच्या लोकसंख्या क्षेत्रांचा अभ्यास केल्यानंतर दक्षिण आशिया विशेषकरून भारतात कोरोनामुळे कमी मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. भारतातील लोकांच्या शरीरात एसीई-२ हा जिन सर्वाधिक आहे. हा चीन कोरोनाशी लढण्याची प्रतिकारशक्ती शरीराला देतो, हे त्यामागचं कारण असल्याचं अध्ययनातून समोर आलं आहे. युरोपीयन देशांशी तुलना केल्यास दक्षिण आशिया आणि भारतीय लोक कोरोनापासून १२ टक्के अधिक सुरक्षित असल्याचे हे संशोधन म्हणते.
3 / 10
भारतात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी असण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे एसीई जीन आहे. काशी हिंदू विद्यापीठामधील जीवशास्त्राचे प्राध्यापक ज्ञानेश्वर चौबै यांनी सांगितले की, कोरोनामुळे माणसाची सुरक्षा प्रणाली चांगल्या पद्धतीने काम करत नाही आहे, त्यामागचं नेमकं कारण काय, तसेच काही लोकांवर या विषाणूचा म्हणावा तसा परिणाम होत नाही याचं कारण जाणून घेण्यासाठी जगभरातील मानवी जीनोमचा अभ्यास करण्यात आला.
4 / 10
प्राध्यापक चौबै यांनी सांगितले की या संशोधनामध्ये आफ्रिका, युरोप, दक्षिण आशिया, दक्षिण मध्या आशिया आणि सैबेरिया येथील लोकांचा समावेश करण्यात आला. आम्ही जगभरातील ५८३ लोकांचा अभ्यास केला त्यानंतर यासंदर्भाच पाच पेपर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळा इटली आणि युरोपीय देशांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक होते. मात्र भारत आणि दक्षिण आशियातील लोकांच्या जीनोमचा स्ट्रक्सरअशा प्रकार आहे की ज्यामुळे भारतात मृत्यूदर खूप कमी आहे.
5 / 10
दक्षिण आशियाई जीनोम पूर्व आशियाई जीनोमशी मिळतेजुळते होते. तर युरोपियन आणि अमेरिकन जीनोम हे एकमेकांसोबत मिळतेजुळते होते. ईराणचा जीनोम भारतीयाशी मिळताजुळता असला पाहिजे होता. मात्र तो युरोपियनांशी जुळला. दक्षिण आशियामधील जीनोममध्ये म्युटेशन मोठ्या प्रमाणात दिसून आले. त्यामुळे कोरोना विषाणूचा शरीरामध्ये ज्या मार्गातून प्रवेश होतो, तिथे कोरोना विषाणूला खूप गुंतागुंतीचा सामना करावा लागत आहेत. मा्त्र भारतात मृत्यूदर कमी आणि रिकव्हरी रेट अधिक असण्याचं कारण जीनोम एसीई-२ हाच आहे.
6 / 10
कुणाच्याही शरीरामध्ये कोरोना विषाणूचा प्रवेश झाल्यानंतर तो आपली प्रतिरूपे तयार करण्यास सुरुवात करतो. म्हणजेच आपल्यापासून अनेक कोरोना विषाणू तयार करतो. शरीरातील एक्स क्रोमोझोमवर एक जीनोम एसीई-२ असतो. हाच रिसेप्टर म्हणजेच यजमानाचं काम करतो. कोरोना विषाणू या जिनोमशी जुळवून घेत अनेक विषाणू तयार करतो. मात्र भारत आणि दक्षिण आशियामधील लोकांच्या शरीरात एसीई-२ जीनोम एवढ्या मोठ्या प्रमाणावर म्युटेशन कॅरी करत आहे की ज्यामुळे कोरोनाचा शरीरातील प्रवेश करण्याचे प्रमाण घटले आहे.
7 / 10
प्राध्यापक चौबै यांचे हे संशोधन एक मल्टी डिसिप्लिनरी अध्यन आहे.  ज्यामध्ये स्वीत्झर्लंड, कोलकाता, दिल्ली आणि बीएचयूमधील जीवशास्त्र विभागातील तज्ज्ञ संशोधकांचाही समावेश होता. भारतात जिथे या म्युटेशनचा दर कमी आहे तिथे अधिक मृत्यू होत आहेत आणि जिथे म्युटेशनचे प्रमाण जास्त आहे तिथे मृत्यूचे प्रमाण कमी असून, रिकव्हरी रेट चांगला आहे.
8 / 10
या रिसर्च टीममध्ये सहभागी झालेले तज्ज्ञ प्रज्वल प्रताप सिंह यांनी सांगितले की,महाराष्ट्रामध्ये भारताच्या अन्य भागांच्या तुलनेत एसीई-२ च्या फ्रिक्वेंसीचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. तर झारखंड आणि उत्तर-पूर्वेकडील आदिवासी जमातींमध्ये या फ्रिक्वेंसीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे तिथे कोरोनाचे प्रमाण कमी आहे.
9 / 10
भारतीयांमध्ये हर्ड इम्युनिटीपेक्षा कोरोनाविरोधातील प्रतिकारक्षमता आधीपासूनच उपस्थित आहे. ही क्षमता लोकांच्या शरीरातीत पेशींमध्ये उपस्थित एक्स क्रोमोसोमच्या जीन एसीई-२ रिसेप्टरमधून मिळते. त्यामुळेच या जीनमध्ये चाललेले म्युटेशन कोरोना विषाणूला पेशींमध्ये प्रवेश करण्यापासून रोखते. या म्युटेशनचं नाव आरएस २२८५६६६ आहे. भारतातील लोकांच्या जिनोममध्ये एवढ्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकारचे म्युटेशन आहे. ज्यामुळे देशात मृत्युदर कमी आणि रिकव्हरी दर अधिक आहे.
10 / 10
एका व्यक्तीच्या शरीरामध्ये तब्बल ३.२ अब्ज पेशीं असतात. प्रत्येक पेशीमध्ये डीएनए असतो. हा डीएनएच पेशींना कुठले काम आवश्यक आहे आणि कुठले नाही, यासंबंधीचे आदेश देत असतो. हाच डीएनए जेव्हा शरीरावर कुठल्याही विषाणूचा हल्ला होतो तेव्हा त्याला रोखण्यासाठी आदेश देतो. डीएनएमध्ये १ पासून २२ पर्यंत क्रोमोसोम असतात. ज्यांना आपण एक्स आणि वाय क्रोमोसोम म्हणून ओळखतो. यामधील एक्स क्रोमोसोमवर एसीई-२ रिसेप्टर आढळतो. त्याच्यावरच कोरोना विषाणूकडून हल्ला होतो. कुठल्याही प्राण्याच्या डीएनएमधील सर्व जीनांच्या साखळीला जीनोम म्हणतात. हा एसीई-२ रिसेप्टरसुद्धा जीनोमचाच एक भाग आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यBHUबनारस हिंदू विश्वविद्यालयscienceविज्ञान