ऑक्सफोर्डच्या कोरोना वॅक्सीनचं भारतात उत्पादन सुरू, लाखो डोज होतील तयार.... By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2020 11:24 AM
1 / 8 ब्रिटनची औषध तयार करणारी कंपनी एस्ट्राजेनेकाकडून सांगण्यात आले आहे की, त्यांनी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीकडून तयार केलेल्या कोरोना व्हायरस वॅक्सीनच्या लाखो डोजची निर्मिती सुरू केली आहे. कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, ब्रिटन, स्वित्झर्लॅंड, नॉर्वे सोबतच भारतातही ही वॅक्सीन तयार केली जात आहे. 2 / 8 ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने AZD1222 नावाने कोरोनाची वॅक्सीन तयार केली आहे. सुरूवातीच्या ट्रायलमध्ये वॅक्सीनचा रिझल्ट चांगला आला आहे आणि पुढील ट्रायलही सुरू आहेत. 3 / 8 एस्ट्राजेनेकाचे सीइओ पॅस्कल सोरिअट यांनी बीबीसीला सांगितले की, आम्ही वॅक्सीन आम्ही वॅक्सीनची निर्मिती सुरू करत आहोत. रिझल्ट पूर्ण येईपर्यंत आमच्याकडे वॅक्सीन असेल. पण यात रिस्कही अशी आहे की, याचा फायनल रिझल्ट बरोबर आला नाही तर ही वॅक्सीन बेकार होईल. 4 / 8 ते म्हणाले की, कंपनी या वॅक्सीनमधून फायदा कमावणार नाही जोपर्यंत WHO महामारी संपल्याची घोषणा करत नाही. त्यांनी भारतातील सीरम इन्स्टिट्यूटसोबत एक अब्ज वॅक्सीनच्या निर्मितीचा करार केलाय. 2021 पर्यंत एक अब्ज वॅक्सीनचे डोज तयार करण्याचं लक्ष्य आहे. तर 2020 च्या शेवटपर्यंत 40 कोटी डोज तयार केले जाऊ शकतात. 5 / 8 ब्रिटीश कंपनी एस्ट्राजेनेकाकडून सांगण्यात आले की, सप्टेंबरपर्यंत जगभरातील फॅक्टरींमध्ये वॅक्सीनचे लाखो डोज तयार होतील. तेच 2021 च्या मध्यापर्यंत 2 अब्ज डोज तया होतील. 6 / 8 एस्ट्राजेनेका कंपनीने अमेरिकेला 40 कोटी वॅक्सीन सप्लाय करण्याचा करार केलाय. तर कंपनी ब्रिटनला 10 कोटी वॅक्सीन देतील. पण वॅक्सीन सप्लाय ऑक्सफोर्डच्या सफलतेवर निर्भर आहे. 7 / 8 ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी ऑगस्टपर्यंत वॅक्सीनचा फायनल रिझल्ट जारी करू शकते. सुरूवातीला AZD1222 चं परिक्षण 18 ते 55 वयोगटातील 160 निरोगी लोकांवर करण्यात आलं. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यांतील ट्रायल सुरू केली गेली गेली. 8 / 8 तिसऱ्या टप्प्यात ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी वॅक्सीन टेस्टमध्ये लहान मुलांचा आणि वृद्धांचा समावेश करेल. यादरम्यान एकूण 10260 लोकांवर वॅक्सीनचं परीक्षण केलं जाणार आहे. आणखी वाचा