शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

‘Omicron’ विरुद्धच्या लढाईत मिळालं ‘मजबूत ब्रह्मास्त्र’; AstraZeneca नं दिली आनंदाची बातमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 4:47 PM

1 / 10
कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटविरोधातील लढाईत लसीच्या दोन डोससोबतच बूस्टर डोसही प्रभावशाली असल्याचं मानलं जात आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन बूस्टर डोस ओमायक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटविरोधात प्रभावी ठरत असल्याची स्टडी मंगळवारी समोर आली होती.
2 / 10
आता त्यानंतर एस्ट्राजेनेका बूस्टर डोसबाबतही आनंदाची बातमी आहे.(Astrazeneca Booster Dose) गुरुवारी याबाबतचा नवी स्टडी रिपोर्ट समोर आला आहे. त्याप्रमाणे एस्ट्राजेनेका बूस्टर डोस व्हॅक्सजेवरिया(Vaxzevria) ओमायक्रॉनविरोधात मोठ्या प्रमाणात अँन्टिबॉडी निर्माण करतो असं आढळलं आहे.
3 / 10
या चाचणीच्या सुरुवातीच्या डेटात आढळलं की, Covid 19 चा तिसरा डोस व्हॅक्सजेवरिया ओमायक्रॉन व्हेरिएंटसोबतच बीटा, डेल्टा, अल्फा आणि गामासह अन्य व्हेरिएंटविरोधातही मानवी शरीरात चांगल्यारितीने अँन्टिबॉडी निर्माण करत आहे.
4 / 10
ही लस बूस्टर डोस म्हणून दिली जाणार आहे. औषध निर्मात्या कंपनीचं म्हणणं आहे की, व्हॅक्सजेवरिया अथवा MRNA व्हॅक्सिन घेतलेल्यांमध्ये याचे परिणाम पाहायला मिळाले. संपूर्ण जगाला बूस्टरची आवश्यकता पाहता लवकरच हा डेटा रेग्युलेटर्सकडे सोपवण्यात येईल.
5 / 10
मागील महिन्यात एका लॅब स्टडीत दिसून आलं की, व्हॅक्सजेवरियाचे तीन डोस वेगाने पसरत असलेल्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी आहेत. कंपनीकडून सुरु असलेल्या चाचणीनंतर बूस्टर डोसवर जारी करण्यात आलेला हा पहिला डेटा आहे.
6 / 10
एस्ट्राजेनेका व्हॅक्सिन ऑक्सफॉर्ड विश्वविद्यालयच्या संशोधकांनी बनवली आहे. भारतात ही व्हॅक्सिन कोविशील्ड नावानं बनवण्यात येत आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोविशील्ड लसीची निर्मिती करते. या कंपनीचे CEO अदार पूनावाला त्यांनी हा डेटा शेअर केला आहे.
7 / 10
अदार पूनावाला यांनी हा डेटा शेअर करत खूप उत्साहवर्धक बातमी असल्याचं म्हटलं आहे. ऑक्सफोर्ड व्हॅक्सिन ग्रुपचे प्रमुख एंड्रयू पोलार्ड यांनी निवेदनात म्हटलंय की, या महत्त्वपूर्व रिपोर्टमधून कळालं की, या लसीचे दोन डोस घेतल्यानंतर व्हॅक्सजेवरियाचे तिसरा डोस घेतल्यास खूप फायदेशीर ठरत आहे.
8 / 10
व्हॅक्सजेवरियाचा तिसरा डोस अथवा mRNA इनएक्टिवेटेड व्हॅक्सिन घेतल्यानंतर कोविड १९ विरोधात मजबूत इम्युनिटी मानवी शरीरात तयार होते. डिसेंबरमध्ये मोठ्या पातळीवर झालेल्या एका ब्रिटीश चाचणीत आढळलं की, एस्ट्राजेनेका, फायझर लस ज्या mRNA तंत्रज्ञानावर बनलेली आहे. ती घेतल्यानंतर एस्ट्राजेनेकाचा बूस्टर डोस जास्त अँन्टिबॉडीच बनवतो.
9 / 10
भारतात १० जानेवारीपासून सर्व शासकीय, महापालिका, खासगी लसीकरण केंद्रांवर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी आणि ६० वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस देण्यात येत आहे. दुसरी मात्रा घेतल्याच्या तारखेपासून ९ महिने किंवा ३९ आठवडे पूर्ण झाले असल्यास त्यांना बूस्टर डोस देण्यात येत आहे.
10 / 10
देशामध्ये ३०० जिल्ह्यांमध्ये दर आठवड्याचा संसर्गदर ५ टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ, गुजरात या राज्यांतील कोरोना स्थिती चिंतेचा विषय बनली आहे, असे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे.
टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनCorona vaccineकोरोनाची लस