CoronaVirus : Avoid to touch these things during corona virus lockdown myb
CoronaVirus : कोरोनापासून बचावासाठी फक्त एकच मार्ग, आपोआपच कमी होतील रुग्ण By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 5:41 PM1 / 10कोरोना व्हायरस जगभरासह भारतात सुद्धा झपाट्याने पसरत आहे. या महामारीतून लोकांना वाचण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत कोरोनावर कोणतीही लस उपलब्ध झालेलं नाही. असं असलं तरी काही गोष्टींचा रोजच्या जगण्यात बदल करून तुम्ही कोरोनापासून लांब राहू शकता. याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.2 / 10 सामान आणण्यासाठी तुम्ही बाजाारात जात असाल तर कॅशचा वापर न करता डिजीटल पेमेंट करा. तसंच किराणामालाच्या दुकानातील ट्रॉलीला हात लावायच्या आधी सॅनिटायजर वापरा.3 / 10काही दिवस घराबाहेर पडणं पूर्णपणे टाळा. कारण कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता कुटुंबाची काळजी घेणं आत्ताच्या घडीला गरजेचं असल्यामुळे बाहेर पडणं टाळा.4 / 10कोरोना व्हायरसची महामारी संपेपर्यंत एकमेकांना भेटून हात मिळवण्यापेक्षा फिस्ट बंप करा. म्हणजेच आपले हाताची मुठ बंद करून समोरच्या व्यक्तीच्या मुठीला स्पर्श करा. अशाप्रकारे अभिवादन केल्यास कोणताही संसर्ग होणार नाही.5 / 10घरातील बेडशिट, पायपुसणी संक्रमित व्यक्तीच्याच स्पर्शाने दुषित होऊ शकतात. त्यासाठी बारकाईने घरातील प्रत्येक वापराच्या कपड्यांची स्वच्छता करा. 6 / 10लोकांच्या गरजा लक्षता घेता सरकारने एटीएम बंद केलेले नाहीत. एटीएममध्ये अनेक लोकांचा वावर असतो. त्यामळे हाताला सॅनिटाईज करूनचं एटीएममध्ये प्रवेश करा.7 / 10टिव्हीच्या रिमोटला दिवसभरातून अनेक व्यक्ती हात लावत असतात. त्यासाठी कधीही रिमोटला हात लावताना सॅनिटाईज करून घ्या. 8 / 10डिजिटल पेमेंटचा वापर करा. कारण पैशांमार्फत कोरोनाचा होणार प्रसार टाळायचा असेल तर हार्ड कॅश देऊ नका,9 / 10ऑनलाईन सामान किंवा जेवण मागवत असाल तर सामानाचे डबे आधी सॅनिटाईज करून मगच बाहेर काढा. 10 / 10भांडी स्वच्छ करण्यासाठी वारंवार एकाच स्पॉजचा वापर केला जातो. त्यातून व्हायरस पसरण्य़ाची शक्यता असते. त्यासाठी लिक्वीडचा वापर करून भांडी स्वच्छ करा. एकच स्पॉज अनेकदा वापरू नका. आणखी वाचा Subscribe to Notifications