शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: चिंताजनक! अचानक लहान मुलांना होतेय कोरोनाची लागण; XE व्हेरिएंट ठरतोय घातक?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 5:50 PM

1 / 10
देशातील अनेक राज्यांत कोरोना रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. यावेळी शाळकरी मुलं कोरोनानं अधिक संक्रमित होत असल्याचं दिसून येत आहे. दिल्ली-NCR मध्ये आतापर्यंत ४० हून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाल्यानं चिंता वाढली आहे.
2 / 10
शाळा पुन्हा सुरू केल्यानंतर मुलांमध्ये कोरोना संक्रमण वाढले आहे. त्यामुळे कोरोनाची चौथी लाट येतेय की काय अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे. लहान मुलांचे लसीकरण जास्त प्रमाणात व्हावं यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.
3 / 10
मात्र कोरोनाच्या नव्या XE व्हेरिएंटमुळे लहान मुलांमध्ये कोरोना संक्रमण वाढतेय का? असा प्रश्न आता निर्माण होऊ लागला आहे. लहान मुलांच्या बाबतीत शाळांमध्य कोविड नियमांचे पालन होतंय का यावरही शंका उपस्थित केली जाऊ लागली आहे.
4 / 10
याबाबत डॉ. जुगल किशोर म्हणाले की, शाळा उघडल्यानंतर आता मुलांचे शाळेत येणं सुरू झालं आहे. विनामास्क आणि सोशल डिस्टेंसिंग पालन न करता एकमेकांना भेटत आहेत. मात्र कोरोना व्हायरस अद्यापही संपलेला नाही. तो आपल्या आसपासच आहे.
5 / 10
कोरोना म्यूटेट होऊन नवीन व्हेरिएंट समोर येत आहे. त्यामुळे नव्या व्हेरिएंटमुळे लहान मुलांमधील कोरोना संक्रमण वाढण्याचीही शक्यता आहे. कारण जी मुलं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोविड पॉझिटिव्ह झाली नव्हती ते आता संक्रमित होत आहेत.
6 / 10
परंतु डॉक्टरांनी पालकांना घाबरण्याची गरज नाही असं म्हटलं आहे. लहान मुलांमध्ये संक्रमण एखाद्या व्हायरल प्रमाणे असेल त्यामुळे त्याचा धोका नाही असंही त्यांनी सांगितले. मुलं संक्रमित होत असल्याचं समोर आल्याने नवा व्हेरिएंट त्याला कारणीभूत असल्याची शक्यता आहे.
7 / 10
सध्या देशात XE व्हेरिएंट समोर आला आहे. हा व्हेरिएंट लहान मुलांना संक्रमित करत आहेत. हा व्हेरिएंट वेगाने संक्रमित होत असल्याने कोरोना रुग्णसंख्या वाढण्याचीही शक्यता आहे. तर डॉ. जुगल किशोरप्रमाणे डॉ. युद्धवीर सिंह यांनी नवा व्हेरिएंट लहान मुलांना संक्रमित करण्यासाठी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.
8 / 10
संक्रमित लहान मुलांचे नमुने घेऊन जीनोम सीक्वेंसिंगची चाचणी करण्यात यावी. त्यामुळे कोरोनाचा कुठला नवा व्हेरिएंट आहे की XE व्हेरिएंट आहे हे कळून येईल. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी मदत होईल असंही डॉ. युद्धवीर सिंह यांनी सांगितले.
9 / 10
त्याचसोबत भलेही मुलं संक्रमित होत असले तरी त्यांच्यात कोविडची सौम्य लक्षणं दिसत आहेत. जर XE व्हेरिएंट असेल तरी चिंता करण्याची गरज नाही. कारण हा ओमायक्रॉनचाच एक भाग आहे. ओमायक्रॉनविरोधात मुलांमध्ये इम्युनिटी तयार झालेली आहे.
10 / 10
शाळा बंद करण्याची आवश्यकता नाही. ज्या मुलांना कोरोना होईल त्यांना घरीच आयसोलेसनमध्ये ठेवावं. कारण संक्रमणाचे काही रुग्ण येतील परंतु शाळा बंद केल्या तर गेल्या २ वर्षात मुलांचे जे शैक्षणिक नुकसान झाले ते भरून काढता येणार नाही असंही डॉक्टर म्हणाले.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या