Coronavirus china factory farming deadlier pathogen risk new pandemic
धोका वाढला! कोरोनापेक्षाही महाभयंकर विषाणू पसरण्याचा धोका; तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' कारण By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 2:10 PM1 / 8जगभरातील प्रमुख वैज्ञांनिकांनी धोक्याची सुचना दिली आहे की चीनमध्ये कोरोना व्हायरसपेक्षा घातक स्वरुपाच्या व्हायरसचा प्रसार होत आहे. विशेष म्हणजे हा व्हायरस माणसांमध्येही पसरू शकतो.2 / 8वर्ल्ड एनिमल प्रोटेक्शनसह कार्यरत असलेल्या वैज्ञानिक ब्लॅसजॅक यांनी सांगितले की, आक्रमक पद्धतीने पशुपालन केले जात आहे. त्यामुळे एंटीबायोटीक रेजिस्टेंससोबत कोरोनापेक्षा धोकादायक विषाणू जन्म घेऊ शकतो. 3 / 8Express.co.uk च्या रिपोर्टनुसार सिंगापूरमध्ये राहत असलेल्या ब्लॅसजॅक यांनी सांगितले की. चीनमध्ये बर्ड फ्लूच्या २ नवीन प्रकारांसोबत झुंज दिली जात आहे. या व्यतिरिक्त एवियन इंफ्लूएंजा व्हायरसमुळे स्वाईन फ्लूचे प्रमाण वाढलं आहे. या व्हायरसमध्ये माणसांच्या श्वसन संस्थेवर आक्रमण करण्याची क्षमता असते. 4 / 8केट यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या १५ वर्षात चीनमधील पशूपालनात मोठ्या प्रमाणात बदल घडून आला आहे. परंपरागत पशुपालन न करता आक्रमक पशुपालन केलं जात आहे. ज्यात नियमांचे पालन केलं जात नाही. 5 / 8खूप कमी जागेत मोठ्या संख्येने प्राण्यांना ठेवलं जातं. अशा वातावरणात व्हायरसचं म्यूटेशन जास्त वेगाने होऊ शकतं. म्हणजेच व्हायरस आपली सख्या जलद गतीने वाढवू शकतो. 6 / 8त्या परिसरातून बाहेर येत असलेल्या कचऱ्यापासून माणसांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. 7 / 8चीनमध्ये डुक्करांचे मासांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. चिकनच्या उत्पादनात चीन जगभरातून दुसऱ्या क्रमांकावर आहे. 8 / 8दरम्यान चीनच्या मासळी आणि प्राण्यांच्या बाजारातून कोरोना हा जीवघेणा विषाणू पसरल्याचा दावा अनेक तज्ज्ञांनी केला आहे. (Image credit- The New Yorker) आणखी वाचा Subscribe to Notifications