Coronavirus : Corona Kavach app will protect you from virus threat, Know how it works api
Coronavirus : शाब्बास! सरकारनं आणलं 'कोरोना कवच'; संक्रमित व्यक्ती जवळ येताच मिळणार अलर्ट By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 4:26 PM1 / 11कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे आपण स्वत:ला पुढील काही दिवसांसाठी घरात बंद करून घेतलं असेल, पण याचा अर्थ होत नाही की, आपण पूर्णपणे सुरक्षित आहोत. अशात भारत सरकारने एक अॅन्ड्रॉईड फोनसाठी कोरोनाव्हायरस डिटेक्शन अॅप लॉन्च केलंय. 2 / 11भारत सरकारच्या आरोग्य विभागाकडून हे अॅप सुरू करण्यात आलं आहे. ‘कोरोना कवच’ असं या अॅपला नाव देण्यात आलंय. हे अॅप माहितीचा सर्वात विश्वसनीय स्त्रोत मानलं जात आहे. कारण याने तपासता येतं की, तुमच्या क्षेत्रात कुणी कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह रूग्ण आहे.3 / 11अशाप्रकारे तुम्ही अलर्ट राहण्यासाठी आणि प्रभावित क्षेत्रात जाण्यास स्वत:ला किंवा इतरांना रोखू शकता. जसजसा भारतात कोरोनाचा धोका वाढत आहेत, त्यात हे अॅप गरजेचं ठरत आहे. याने अनेक जणांचा बचाव होऊ शकतो.4 / 11कोरोना कवच हे एक अॅन्ड्रॉईड अॅप आहे. ज्याने तुम्ही ही माहिती घेऊ शकता की, तुमच्या आसपास कुणी कोरोनाची लागण झालेला रूग्ण आहे की नाही. या अॅपद्वारे संक्रमित व्यक्तीकडे असलेल्या जीपीएस सेवांचा वापर केला जातो. 5 / 11 तसेच या अॅपकडून दर एका तासाने अलर्ट पाठवला जाईल. तसेच संक्रमित व्यक्तींचा सर्व डेटा यावर बघता येईल. हे अॅप आरोग्य विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स-सूचना मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने तयार केलं आहे. 6 / 11हे अॅप तुम्ही Google Play Store वरून डाउनलोड करू शकता. हे अॅप आयफोन वापरणाऱ्यांना डाउनलोड करता येणार नाहीय. 7 / 11हे अॅप दर एक तासाने यूजरचं लोकेशन ट्रॅक करून चेक करतं की, त्यांना व्हारसचा धोका आहे की नाही. यात तुम्हाला 6 प्रश्न असलेला एक फॉर्म भरावा लागेल. त्यात काही कोरोनाच्या लक्षणांसंबंधी प्रश्न असतील8 / 11लोकेशन आणि इतर माहितीच्या आधारावर अॅपच्या सर्वात वरच्या बाजूला एक रंग दिसेल. हिरव्या रंगाचा अर्थ सगळं काही ठीक आहे. नारंगी रंगाचा अर्थ तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज आहे. पिवळ्या रंगाचा अर्थ क्वारंटाईन होण्याचा संकेत देतो, तर लाल रंग तुम्ही इन्फेक्टेड असल्याचं दर्शवतो. 9 / 11घरातून बाहेर निघताना तुम्ही अॅपवरील कवचाला टॅप करून अॅक्टिवेट करू शकता. तुमची हालचाल याने ट्रॅक होईल. अॅप डाउनलोड केल्यावर तुम्ही मोबाइल नंबरने साइन कऱण्यास सांगितले जाते. तसेच तुमच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी हे अॅप तुमच्या जीपीएसचा वापर करेल.10 / 11जेव्हाही तुम्ही कोरोना व्हायरसचा धोका असलेल्या भौगोलीक भागात किंवा कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीच्या जवळ जात असाल तर तुम्ही अलर्ट पाठवला जाईल. 11 / 11तसेच जर तुमच्या संपर्कात येणाऱ्या दुसऱ्या यूजरने जर अॅपमध्ये स्वत:ला क्वारंटाईन किंवा इन्फेक्टेड मार्क केलं तर अॅप तुम्हाला अलर्ट देईल. त्यामुळे सर्वच यूजर्सच्या मोबाइलमध्ये हे अॅप असणं गरजेचं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications