शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

होम आयसोलेशनमध्ये असताना ही लक्षणं दिसताच त्वरित रुग्णालय गाठा; एम्स प्रमुखांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 3:24 PM

1 / 8
भारतात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या केसेसमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. रुग्णालयात आयसीयू बेड, ऑक्सिजन आणि औषधांच्या कमतरतेमुळे लोकांची अवस्था खूप खराब झाली आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार आयसीयूबेड, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे घरात आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे. पण घरीच रिकव्हर होत असतानाही काही लक्षणांना लक्षात घेणं गरजेचं आहे. तरच गंभीर स्थितीपासून बचाव होऊ शकतो.
2 / 8
नवी दिल्लीतील एम्सचे संचालक डॉ. रणदिप गुलेरिया यांनी आरोग्य मंत्रालयाच्या ट्विटर अकाऊंटवरून काही मुद्दे शेअर केले आहेत. यातून त्यांनी लोकांना वॉर्निंग साईन्सला ओळखण्याचा सल्ला दिला आहे.
3 / 8
डॉ. गुलेरिया म्हणाले की, ''लोकांना वॉर्निंग साईन्सबाबत माहित असायला हवं. जर तुम्ही होम आयसोलेशनमध्ये असाल तर नेहमीच डॉक्टरांच्या संपर्कात राहायला हवं. प्रत्येक राज्यात हेल्पलाईनची सुविधा देण्यात आली आहे. रुग्ण यावर फोन करून सकाळ संध्याकाळ माहिती मिळवू शकतो.''
4 / 8
जर कोणत्याही रुग्णाचे सॅच्यूरेशन ९३ किंवा त्यापेक्षा कमी असेल किंवा ताप, छातीत वेदना होणं श्वास घ्यायला त्रास होणं अशी लक्षणं दिसत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा. या स्थितीत रुग्णांनी घरीच राहायल हवं. वेळेवर औषधं न घेतल्यास धोका वाढू शकतो.
5 / 8
डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, रिकव्हरी रेट चांगला असल्यामुळे रुग्णालयात काही बेड, ऑक्सिजनच्या ज्या समस्या सामना करावा लागला होता.
6 / 8
आता राज्य आणि केंद्र सरकारनं नवीन रुग्णालयं उघडली आहेत. ऑक्सिजनचा पुरवठाही वाढवला आहे. अनेक ठिकाणी कॅम्प लावण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी रुग्ण आरामात राहू शकतात.
7 / 8
डॉ. गुलेरिया यांनी सांगितले की, कोरोना व्हायरसची दुसरी लाट आल्यानंतर व्हायरस म्यूटेट होऊन अधिक इंफेक्शियस होईल. याबाबत कोणालाही माहिती नव्हती.
8 / 8
भारतात प्रतिदिवशी चार लाख प्रकरणं समोर येण्याची शक्यता वर्तवली जात होती. आता कोरोनाशी लढा देण्यासाठी लवकरात लवकरआयसोलेट करून रुग्णांनी योग्य उपचारांसह काळजी घ्यायला हवी.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याExpert Opinionतज्ज्ञांचा सल्लाcorona virusकोरोना वायरस बातम्या