शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

युद्ध जिंकणार! भारतात कोरोनाची पहिली लस तयार होणार; जाणून घ्या 'या' १० महत्वाच्या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2020 9:56 AM

1 / 10
जगभरातील संशोधकांप्रमाणे भारतातही कोरोना व्हायरसची लस शोधण्यासाठी तज्ज्ञांचा प्रयत्न सुरू आहे. भारतात जवळपास ११ पेक्षा जास्त लसी अशा आहेत. ज्यांना मानवी परिक्षणासाठी परवानगी मिळाली आहे. सध्या कोवेक्सीन (Covaxin) या लसीची चर्चा सर्वत्र सुरू आहे. आज आम्ही तुम्हाला या लसीच्या चाचण्यांबाबत सांगणार आहोत.
2 / 10
कोवेक्सीनच्या पहिल्या चाचणीत ३७५ लोकांचा समावेश असेल. या लोकांना १२५ ते १२५ अशा तीन ग्रुपमध्ये विभागले जाईल. सगळ्यांना लसीचे डोस दिले जाणार आहेत. त्यानंतर दुसरा डोज हा १४ दिवसांनंतर दिला जाणार आहे. त्यानंतरचं मानवी परिक्षण ७५० लोकांवर करण्यात येणार आहे.
3 / 10
. लस तयार करत असलेल्या भारत बायोटेक कंपनीच्या मते पहिल्या टप्प्यातील चाचणीसाठी २८ दिवसांचा कालावधी लागू शकतो. म्हणजेच १८ तारखेच्या आधी या लसीचे ट्रायल सुरू झाले तर १५ ऑगस्टपर्यंत लसीचे पहिले ट्रायल पूर्ण होण्याची शक्यता आहे.
4 / 10
ही लस लॉन्च करण्यासाठी १५ ऑगस्टची डेडलाईन का देण्यात आली असा प्रश्न सगळ्यांनाच पडत आहे. कारण १५ ऑगस्टपर्यंत लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण होणं शक्य नाही. यासाठी दोन महिने किंवा एका वर्षाचा कालावधी लागू शकतो. भारत बायोटेकने आपल्या अहवालात ३ महिन्यांपासून १ वर्षांचा कालावधी लागू शकतो. असे नमुद केले होते. ICMR ने १२ संस्थानांची चाचणी करण्यासाठी निवड केली आहे. त्यात दिल्ली, पटणायेथील एम्सचा सुद्धा समावेश आहे. ही लस १५ ऑगस्टपर्यंत तयार होऊ शकते. अशी शक्यता वर्तवली जात आहे.
5 / 10
सुरूवातीला भारत बायोटेक कंपनीकडून क्लिनिकल ट्रायलचे पॉजिटिव्ह रिजल्ट समोर आले होते. सश्यांवर आणि उंदंरांवर प्रयोग करण्यात आला होता. भारत बायोटेकसोबतच गुजरातची कंपनी जायडस कॅडिला या कंपनीला कोरोनाची लस तयार करण्यासाठी परवागनी मिळाली आहे. या औषधाचे नाव जाइकोव-डी असं ठेवण्यात आलं आहे. कोवेक्सिनप्रमाणे या लसीच्या चाचणीसाठी सुद्धा परवानगी मिळाली आहे.
6 / 10
कोरोना लसीच्या शर्यंतीत सगळ्यात पुढे ChAdOx1 चं नाव आहे. स्वीडनची कंपनी AstraZeneca आणि Oxford यूनिवर्सिटीने मिळून ही लस तयार केली आहे. ब्राजील आणि साऊथ आफ्रिकेत लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात असून ऑक्टोबरपासून ही लस वापरासाठी येण्याची शक्यता आहे.
7 / 10
Moderna कंपनीची mRNA 1273 मे महिन्यापासून चर्चेत आहे. या महिन्यात फेज ३ चे ट्रायल सुरू आहे. २०२१ पर्यंत ही लस तयार होऊ शकते. असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. कोरोनाच्या लसीवर सरकार सुद्धा संभ्रमावस्थेत आहे.
8 / 10
विज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार २०२१ पर्यंत कोरोनाची लस येणं अशक्य आहे. त्यानंतर याबाबतचा दावा मागे घेण्यात आला.
9 / 10
हैदराबादमधील भारत बायोटेक प्राइवेट लिमिटेड कंपनीने दावा केला आहे की. आयसीएमआर आणि आणि नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ विरोलॉजीने मिळून कोविड19 ची ही लस विकसित केली आहे.
10 / 10
हैदराबादमधील भारत बायोटेक प्राइवेट लिमिटेड कंपनीने दावा केला आहे की. आयसीएमआर आणि आणि नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ विरोलॉजीने मिळून कोविड19 ची ही लस विकसित केली आहे.
टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्याResearchसंशोधनHealthआरोग्य