शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कोरोनावर मात करणारी लस कधी येणार? डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं उत्तर; म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2020 6:15 PM

1 / 10
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीकडून कोरोना लसीच्या चाचणीला स्थगिती मिळाल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोना लसीबाबत सकारात्मक दावा केला आहे.
2 / 10
कोरोनाची लस पुढील काही आठवड्यात मिळू शकते असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.
3 / 10
दरम्यान कोरोनाच्या विरोधातील लढाईत मोठं अपयश आलं असून, लढ्याला मोठा धक्का बसला आहे.
4 / 10
अ‍ॅस्ट्रॅजेनेका(AstraZeneca) आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी लस(Oxford covid-19 Vaccine)च्या मानवी चाचणीत सामील असलेली व्यक्ती आजारी पडल्यानंतर त्याचा प्रयोग थांबवण्यात आला आहे.
5 / 10
अ‍ॅस्ट्रॅजेनेका व्यतिरिक्त इतर अनेक कंपन्याच्या लसीच्या अमेरिकेत चाचण्या सुरू आहेत. यात मॉडर्ना, फायजर यांचा समावेश आहे.
6 / 10
ट्रम्प अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणूकांआधी कोरोनाची लस लॉन्च करण्याच्या विचारात आहेत.
7 / 10
मंगळवारी नॉर्थ कॅरोलियामध्ये एका कॅम्पेन रॅलीदरम्यान टॅम्प यांना लस कधी येणार असं विचारण्यात आलं त्यावर ट्रम्प म्हणाले की, काही आठड्यानंतर लस उपलब्ध होईल.
8 / 10
निवडणूकांच्या आधी लस नाही आली तर २०२० संपण्याआधी लस नक्कीच तयार होईल असं ट्रम्प यांनी अनेकदा सांगितलं आहे.
9 / 10
अमेरिकेत कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ६५ लाख १४ हजार लोकांना कोरोना संक्रमणाचा सामना करावा लागला आहे.
10 / 10
आतापर्यंत १ लाख ९४ हजार लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प