CoronaVirus : Corona virus 5 best tips to wash fruit and vegetable before eat
CoronaVirus :भाज्या आणि फळ घरी आणताना होऊ शकतो कोरोनाच संसर्ग; 'अशी' घ्या काळजी By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 6:22 PM1 / 10संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या संकटाशी सामना करत आहे. व्हायरसच्या संक्रमणाचा धोका दिवसेंदिवस जास्तच वाढत आहे. त्यामुळे लोक खाण्यापिण्याच्या गोष्टी सुद्धा सॅनिटाईज करत आहेत. भाज्या आणि फळांना सुद्धा लोक साबणाने धुत आहेत. अलिकडे करण्यात आलेल्या अभ्यासात भाज्या आणि फळांच्या बाबतीत असं करणं योग्य नसल्याचे सांगितले आहे. 2 / 10कोरोना व्हायरस हा खाण्या पिण्याच्या घटकांपासून पसरतो अशी एकही बाब समोर आलेला नाही. तरी खाण्यापिण्याच्या बाबतीत तज्ज्ञांनी दिलेल्या गाईडलाईन्स आणि नियमांचे पालन करायला हवे. जेणेकरून कोरोनाचा संसर्ग दूर ठेवता येईल.3 / 10फळ आणि भाज्यांना पाण्याने धुण्याच्या आधी स्वतःचे हात स्वच्छ धुवून घ्या. २० सेकंदांपर्यंत हात चांगले स्वच्छ धुतल्यानंतर खाण्याच्या सामानाला हात लावा. 4 / 10भाज्यांना आधी चांगलं उकळून घ्या. कच्च्या आणि पिकलेल्या भाज्या वेगवेगळ्या ठेवा. WHO ने दिलेल्या माहितीनुसार शरीर निरोगी राहण्यासाठी रोज ४०० ग्राम भाज्या आणि फळांचे सेवन करायला हवं.5 / 10बाजारून फळं आणि भाज्या विकत घेतल्यानंतर वाहत्या पाण्यात धुवा. FDA (फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन) ने दिलेल्या माहितीनुसार फळं आणि भाज्या कापण्याआधी धुवून घ्या. जेणेकरून भाज्या कापत असताना घाण किंवा माती सुरीला चिकटणार नाही. 6 / 10बटाटा किंवा गाजर अशा भाज्यांवरील माती काढून टाकण्यासाठी ब्रश किंवा स्पंजचा वापर करा. 7 / 10FDA ने दिलेल्या माहितीनुसार साबण, डिटेर्जेंटने खाण्याच्या वस्तूंना स्वच्छ करणं योग्य नाही. फक्त स्वच्छ आणि वाहत्या पाण्यात धुवायाला हवं. 8 / 10बाजारातून आणलेल्या खाण्याच्या वस्तू कमीतकमी ४ तासांसाठी बाहेर ठेवा. काहीवेळासाठी तुम्ही गरम पाण्यामध्ये बेकिंग सोडा घालून भाज्या भिजवून ठेवू शकता. कारण सॅनिटायजर खाण्याच्या पदार्थांसाठी वापरू शकत नाही. 9 / 10डेअरी प्रोडक्ट्स दूध, दही, पनीर यासारखी खाद्यपदार्थ काहीवेळ बाहेर ठेवा. नंतर पाण्याने धुवून मगच फ्रिजमध्ये ठेवा.10 / 10प्लास्टिक किंवा धातूच्या वस्तूंवर व्हायरस २४ ते ४८ तासांपर्यंत जीवंत राहू शकतो. त्यामुळे बाहेरून आणलेल्या अशा वस्तू लगेचच फ्रिजमध्ये ठेवू नका. (Image credit : telanganatoday) आणखी वाचा Subscribe to Notifications