शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

coronavirus: मानवी मेंदूवरही हल्ला करतोय कोरोना विषाणू? स्ट्रोक, मेमरी लॉसची समस्या वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 4:16 PM

1 / 7
तीव्र ताप, सुका खोकला, गळ्यामध्ये सूज, थकवा आणि श्वास घेण्यास होणारा त्रास ही कोरोना विषाणूच्या संसर्गाची प्रमुख लक्षणे आहेत. कोविड-१९च्या रुग्णांमध्ये हल्ली गोंधळ, वास न येणे, वर्तनातील बदल अशी काही न्यूरोलॉजिकल लक्षणेही दिसू लागली आहेत. तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या काही रुग्णांच्या मानसिक स्थितीवरही विपरित परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
2 / 7
कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये आता स्ट्रोक, ब्रेन हॅमरेज आणि मेमरी लॉससारखे काही परिणाम दिसून येऊ लागले आहेत. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाचे एमडी रॉबर्ट स्टिव्हन सांगतात की, कोविड-१९ युनिटमधील सुमारे अर्ध्या रुग्णांमध्ये न्यूरोलॉजिकल लक्षणे दिसून आली आहेत. आता कोरोना विषाणूच्या मेंदूवर विपरित परिणाम का दिसून येत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत.
3 / 7
रॉबर्ट स्टीव्हन्स यांनी जॉन्स हॉपकिन्समध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात त्या शास्त्रज्ञांचे सिद्धांत सूचिबद्ध केले आहेत जे याविषयी संशोधन करत आहेत. या लेखानुसार संपूर्ण जगामध्ये कोविड-१९ च्या आजारामध्ये मेंदूशी संबंधित सर्व लक्षणे दिसून येऊ शकतात. यामध्ये गोंधळ उडणे, बेशुद्ध होणे, स्ट्रोक, चव आणि वास घेता न येणे, डोकेदुखी, मन एकाग्र न होणे आणि वर्तनामधील बदल अशा अडचणी दिसून येऊ शकतात.
4 / 7
रिपोर्टनुसार जर विषाणूने डोक्यात प्रवेश करण्यास सक्षम असेल तर गंभीर आणि अचानक संसर्गाचा धोका खूप वाढू शकतो. चीन आणि जपानमध्ये असे काही रुग्ण आढळून आले आहेत. ज्यांच्यामध्ये विषाणूचा जेनेटिक मटेरियल स्पायनल फ्लडमध्ये दिसून आला होता. तर फ्लोरिडामध्येही असा एक रुग्ण दिसून आला होता. ज्याच्या मेंदूमधील पेशींमध्ये विषाणूचे अवशेष सापडले होते. असे केवळ रक्तवाहिन्या आणि तंत्रिकांमध्ये विषाणूने प्रवेश केल्यानंतरच होऊ शकते.
5 / 7
कोरोना विषाणूशी लढण्याने शरीरातील इम्युन सिस्टिमवरही परिणाम होतो. इनफ्लेमेटरी रिस्पॉन्सदरम्यान, मलाडेप्टिव्ह तयार झाल्यामुळे आजारपणामध्ये शरीरातील उती आणि इतर अवयवांचे नुकसान होते.
6 / 7
कोविड-१९ चा संसर्ग झाल्यानंतर व्यक्तीमध्ये अनेक प्रकारचे मानसिक बदल दिसून येतात. तीव्र तापापासून शरीराच्या विविध भागात ऑक्सिजनची कमतरता ब्रेन डिस्फंक्शनचे कारण ठरते. कोविड-१९ च्या अनेक प्रकरणांमध्ये रुग्णाची शुद्ध हरपणे तसेच तो कोमामध्ये जाण्याची भीतीही दिसून येते.
7 / 7
कोविड-१९ च्या आजारामध्ये शरीरात ब्लड क्लॉटिंग सिस्टिमची समस्या दिसून येऊ शकते. मात्र एका सामान्य व्यक्तीच्या तुलनेत कोविड-१९च्या रुग्णांच्या शरीरात ब्लड क्लॉटिंगची शक्यता अधिक असते. ब्लड क्लॉट्स व्यक्तीची फुप्फुसे आणि शरीरामधील अंतर्गत नसांमध्ये दिसून येऊ शकतात, त्यामुळे रक्तप्रवाह बंद होऊ शकतो. जर ब्लड क्लॉटने मेंदूपर्यंत जाणाऱ्या धमन्यांचा रस्ता बंद केला. तर स्टोकची समस्या निर्माण होऊ शकते.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य