CoronaVirus : Corona virus attacks five main parts of bodies apart from lungs myb
कोरोनाच्या इन्फेक्शनमुळे फक्त फुप्फुसचं नाही तर रक्तवाहिन्यांवर 'असा' होतो गंभीर परिणाम By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 4:24 PM1 / 10कोरोना व्हायरसमुळे जगभरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे. कारण कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर शरीरातील पेशींवर कसा परिणाम होतो. याबाबत आम्ही सांगणार आहोत. 2 / 10कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे शरीरातील श्वसनप्रणाली निष्क्रीय होत असते. त्यासोबत इतर अंतर्गत अवयवांवर कसा परिणाम होतो. याबाबत द लँसेट यात एक रिसर्च प्रकाशित करण्यात आला आहे.3 / 10यात रिसर्चकर्त्यांनी असा दावा केला आहे की कोरोना व्हायरस शरीरातील रक्तवाहिन्यांना आणि रक्ताच्या पेशींना पूर्णपणे खराब करून अवयवांवर परिणाम करत असतो. फुप्फुसांनंतर रक्तवाहिन्यावर कोरोना व्हायरस अटॅक करतो. 4 / 10या व्हायरसचं संक्रमण निमोनियापेक्षा जास्त घातक आहे. कारण हा व्हायरस पेशीचे सुरक्षा कवच असलेल्या एंडोथिलियम या आवरणापर्यंत जाऊन अटॅक करू शकतो. त्यामुळे रोगप्रतिकराकशक्ती कमी होते.5 / 10त्यानंतर शरीरातील वेगवेगळ्या अवयवांपर्यंत होणारा रक्तपुरवठा सुरळीत होत नाही. रक्तपुरवठा संथ गतीने होतो. परिणामी किडनी, आतड्यांची समस्या अधिकच वाढत जाते. 6 / 10हायपरटेंशन, हाय ब्लडप्रेशर, डायबिटीस आणि लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या लोकांना या आजाराचं संक्रमण जलद गतीने होण्याची शक्यता असते. कारण या व्हायरसने एंडोथिलियम या पेशींच्या कवचाला कमकूवत बनवलेलं असतं.7 / 10आरोग्यतज्ञ रुचित्जका यांनी सांगितले की मी आत्तापर्यंत अशा तीन केसेस पाहिल्या आहेत. ज्यात कोरोना रुग्णांच्या रक्तवाहिन्या या व्हायरसने संपूर्ण भरलेल्या होत्या. त्यामुळे शरीरातील अवयवांवर नकारात्मक परिणाम दिसून येत होता. 8 / 10त्यातील ७१ वर्षीय रुग्णाला हायपरटेंशनची समस्या होती.कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर शरीरातील विविध भागांनी आपलं कार्य पूर्णपणे थांबवलं. त्यानंतर काही दिवसातच या व्यक्तीला मृत्यू झाला. 9 / 10भारतात सुद्धा कोरोना व्हायरसपासून लोकांना वाचवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तज्ञांच्यामते या व्हायरसची चेन तोडल्यानंतर संक्रमणाचं प्रमाण कमी होऊ शकतं. 10 / 10भारतात सुद्धा कोरोना व्हायरसपासून लोकांना वाचवण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तज्ञांच्यामते या व्हायरसची चेन तोडल्यानंतर संक्रमणाचं प्रमाण कमी होऊ शकतं. आणखी वाचा Subscribe to Notifications