CoronaVirus : coronavirus can remain in the eye for 21 days after infection myb
इन्फेक्शन झाल्यानंतर २१ दिवसांपर्यंत डोळ्यात राहू शकतो कोरोना व्हायरस, 'असा' झाला खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 11:31 AM1 / 10कोरोनाचं संक्रमण जगभरासह भारतात सुद्धा वाढत चाललं आहे. कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाचं संक्रमण कमी झाल्यानंतरही कोरोना रुग्णांच्या शरीराच्या काही भागांवर कोरोनाचं संक्रमण दिसून येतं. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्याची लक्षण दिसू लागल्यानंतर २१ दिवसांपर्यंत कोरोना व्हायरस डोळ्यांमध्ये राहू शकतो. याविषयी माहिती डेली मेली द्वारे देण्यात आली आहे.2 / 10इटलीच्या नॅशनल इंस्टीट्यूट फॉर इन्फेक्शियस डिसीजच्या संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार डोळे लाल होणं हे सुद्धा कोरोनाचं लक्षण असू शकतं. संशोधकांच्यामते चीनच्या वुहान शहरातून परत आलेल्या इटलीच्या एका ६५ वर्षीय महिलेत दिसून आलेली लक्षणं सगळ्यांना हैराण करणारी होती.3 / 10एकाच दिवसात या महिलेची प्रकृती गंभीर झाल्यामुळे रुग्णालयात भरती करावं लागलं होतं. संक्रमणामुळे या महिलेचे डोळे लाल झाले होते. काही दिवसांनंतर ताप येऊन डोळ्यांच्या वेदना अधिकच वाढत गेल्या. या महिलेच्या डोळ्यांची तपासणी रोज केली जात होती. 4 / 10डॉक्टरांनी या महिलेच्या केसला गांभीर्याने घेतले होते. या महिलेलच्या डोळ्यातून निघत असलेल्या द्रव पदार्थांची रोज चाचणी केली जात होती. यावेळी असं निदर्शनास आलं की या महिलेच्या डोळ्यांमध्ये व्हायरस आहे. 5 / 10हा व्हायरस महिलेल्या डोळ्यात २१ दिवसांपर्यंत राहिला होता. विशेष म्हणजे नाकाच्या आतील भागात हा व्हायरस नसून डोळ्यांमधून निघत असलेल्या द्रवपदार्थांमध्ये पाच दिवसांनंतरसुद्धा दिसून आला होता. 6 / 10संशोधकांनी डोळ्याच्या डॉक्टरांना डोळ्यांची समस्येसाठी रुग्णालयात येत असलेल्या रुग्णांपासून सावधगिरी बाळगण्याचे संकेत दिले आहेत. रुग्णाच्या डोळ्यांची तपासणी करताना सावध राहायला हवं. कारण डोळ्यातील द्रव पदार्थांतून व्हायरसच्या संक्रमणाचा धोका असतो. 7 / 10कोरोना व्हायरस डोळ्यातील द्रवपदार्थांमधून आपली संख्या वाढवत असतो. एनल्स ऑफ इंटरनल मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या शोधानुसार डोळ्यांमधील द्रवपदार्थांत असलेल्या व्हायरसचं संक्रमण अनेकांना होऊ शकतं.8 / 10कोरोना व्हायरसचं संक्रमण होत असलेल्या व्यक्तीचं सगळ्यात पहिलं लक्षण ताप येणं हे आहे. काही केसेसमध्ये तापसह डोळे गुलाबी झाल्याचं सुद्धा दिसून आलं. अशा स्थिती उद्भवल्यास त्वरित तपासणी करणं गरजेचं आहे.9 / 10लहान मुलांमध्ये व्हायरसची लक्षणं वेगवेगळ्या स्वरूपात दिसून आली. इटलीच्या त्वचा रोगतज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार लहान मुलांचे अंगठे, तळव्यांमध्ये आसेली सुज, लालसर त्वचा याला त्यांनी कोविड-टो असं नाव दिलं आहे. 10 / 10इटलीनंतर असे अनेक प्रकार अमेरिका आणि बोस्टनमध्ये दिसून आले आहेत. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता अमेरिकन एकेडमी ऑफ डर्मेटोलॉजीने शारीरिक समस्या उद्भवत असलेल्या मुलांची तपासणी करण्यास सुरूवात केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications