शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus : धक्कादायक! कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं कारण असू शकतं व्हेंटिलेटर, जाणून घ्या कसं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 12:09 PM

1 / 10
कोरोना व्हायरसचं संक्रमण जगभरासह भारतात सुद्धा झपाट्याने पसरत आहे. कोरोनाची लागण होऊन मृत्यू होत असलेल्यांचे सुद्धा प्रमाण वाढलं आहे. अशा परिस्थीतीत लोकांना जीवंत ठेवण्यासाठी ट्रिटमेंटचा भाग म्हणून व्हेंटिलेटरची आवश्यकता भासत आहे. तरी काही डॉक्टर व्हेंटिलेटरचा वापर करणं टाळत आहेत. कारण त्यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका असू शकतो. असं त्यांचं मत आहे.
2 / 10
दरम्यान काही हॉस्पिटलसमध्ये रुग्णांचा मृत्यू व्हेंटिलेटरमुळे झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे तज्ञांच्यामते व्हेंटिलेटर रुग्णांसाठी जीवघेणं ठरू शकतं.
3 / 10
ज्या रुग्णांची फुप्फुसं काम करत नाहीत, अशा लोकांना श्वास घेण्यासाठी त्रास होतो. म्हणून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येतं. यावेळी रुग्णाच्या गळ्यात एक नळी टाकली जाते. त्यामार्फत फुप्फुसांपर्यंत ऑक्सिजन पुरवला जातो. अशा गंभीर स्थिीतीत पोहोचलेल्या रुग्णांचा मोठ्या संख्येने मृत्यू झाला आहे.
4 / 10
श्वास घ्यायला त्रास होत असलेल्या ४० ते ५० टक्के लोकांचा मृत्यू व्हेंटिलेटरवर होतो. हेच न्यूयॉर्कमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू व्हेंटिलेटरवर झाला आहे.
5 / 10
कोरोनाच्या रुग्णांना व्हेंटिलेटर नुकसानकारक ठरत आहे. कारण त्यामुळे जास्त दबावाने ऑक्सिजन फुप्पुसांपर्य़ंत पोहोचवला जातो, असं तज्ञ सांगतात.
6 / 10
अमेरिकन लंग्ज असोशिएशनचे प्रमुख डॉ. अल्बर्ट रिजो यांच्यामते सामान्य मृत्यूदरापेक्षा अधिक मृत्यूदर सध्या दिसून येत आहे. चीन आणि ब्रिटेनमध्ये सुद्धा अशीच परिस्थीती आहे.
7 / 10
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार व्हेंटिलेटरचा वापर केल्यामुळे काही रुग्णांची शारीरिक अवस्था जास्त खराब होऊ शकते.
8 / 10
अनेकदा व्हेंटिलेटरच्या वापरामुळे फुप्फुसांना जखम होण्याची शक्यता असते. त्यामुळे वापर करताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे.
9 / 10
अनेकदा व्हेंटिलेटरच्या वापरामुळे फुप्फुसांना जखम होण्याची शक्यता असते. त्यामुळे वापर करताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे.
10 / 10
अनेकदा व्हेंटिलेटरच्या वापरामुळे फुप्फुसांना जखम होण्याची शक्यता असते. त्यामुळे वापर करताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या