CoronaVirus : Coronavirus vaccine to be ready by january 2021 icmr ex director says myb
मोठा दिलासा! अखेर पुढच्या वर्षी 'या' महिन्यात कोरोनाची लस येणार; ICMR च्या माजी संचालकांचा दावा By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2020 11:33 AM1 / 10कोरोना व्हायरचा प्रसार दिवसेंदिवस जगभरासह भारतातही वाढत आहे. आता भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या एक लाख तीस हजारांच्यावर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 3867 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 2 / 10आयसीएमआरचे माजी संचालक निर्मल गांगुली यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणूंच्या लसीबाबत शंका व्यक्त केली जात आहे. कोरोनाची लस या वर्षांच्या शेवटापर्यंत मिळणं सुद्धा कठीण आहे. भारत बायोटेक कंपनी जेफरसन यूनिवर्सिटी ऑफ फिलाडेल्फिया यांच्यासोबत वॅक्सीन तयार करण्याासाठी प्रयत्न करत आहे. आता आयसीएमआरचा समावेश सुद्धा या संशोधन पध्दतीत आहे.3 / 10आयसीएमआरचे माजी संचालक निर्मल गांगुली यांनी सांगितले की, कोरोनाच्या माहामारीवर मात करणारी लस तयार करण्यासाठी पुढील वर्षी म्हणजेच जानेवारी ते फेब्रुवारी २०२१ पर्यंतचा कालावधी लागू शकतो.4 / 10लस तयार करण्यासाठी लागत असलेल्या कालावधीबाबत सुद्धा यांनी सांगितले. विषाणूंशी लढण्याची क्षमता लक्षात घेऊन लस तयार केली जाणार आहे. जेणेकरून सकारात्मक परिणाम दिसून येतील.5 / 10एनके गांगुली यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात तयार केल्या जात असलेल्या लसीचे उद्दिष्ट असे आहे की, स्पाईक कोडच्या अनुवांशिक कोडची व्यवस्थित ओळख करता येऊ शकते. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. ही लस तयार झाल्यानंतर लोकांची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी वापर केला जाणार आहे. त्यामुळे कोरोना विषाणूंना नष्ट करता येऊ शकतं. 6 / 10ही खूप मोठी प्रक्रिया आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी फेब्रुवारी किंवा जानेवारी महिन्यापर्यंत कोरोनावर मात करणारी लस येऊ शकते. कोरोनाच्या माहामारीतून वाचण्यासाठी देशाला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. 7 / 10कोरोनावर अद्याप कोणतीही लस किंवा औषध प्राप्त झालेली नाही. कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठी गंभीर आजारांवर वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. 8 / 10कोरोनावर अद्याप कोणतीही लस किंवा औषध प्राप्त झालेली नाही. कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठी गंभीर आजारांवर वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. 9 / 10कोरोनावर अद्याप कोणतीही लस किंवा औषध प्राप्त झालेली नाही. कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठी गंभीर आजारांवर वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. 10 / 10कोरोनावर अद्याप कोणतीही लस किंवा औषध प्राप्त झालेली नाही. कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठी गंभीर आजारांवर वापरात असलेल्या औषधांचा वापर केला जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications