Coronavirus : CSIR says people with AB and B blood groups more susceptible to covid 19 infection
सावधान! 'या' दोन ब्लड ग्रुपसाठी कोरोना व्हायरस जास्त घातक, मांसाहारी लोकांनाही तज्ज्ञांचा इशारा.... By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 11:56 AM1 / 9कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) थैमानामुळे देशात गोंधळाचं वातावरण आहे. यादरम्यान काउन्सिल ऑफ सायंटिफिक अॅन्ड इंडस्ट्रिअल रिसर्चने एक रिसर्च पेपर प्रकाशित केला आहे. ज्यातून असा संकेत मिळतो की, AB आणि B ब्लड ग्रुपच्या लोकांनी कोविड-१९ पासून जास्त सांभाळून राहण्याची गरज आहे. यात दावा करण्यात आला आहे की, इतर ब्लड ग्रुपच्या तुलनेत AB आणि B ब्लड ग्रुपच्या लोकांना कोरोना जास्त शिकार करत आहे. 2 / 9या रिसर्च पेपरमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, O ब्लड ग्रुपच्या लोकांवर या व्हायरस सर्वात कमी प्रभाव आहे. या ब्लड ग्रुपचे जास्तीत जास्त रूग्ण एकतर एसिम्प्टोमॅटिक आहेत किंवा त्यांच्यात फार कमी लक्षणे आढळून आले आहेत. हा रिपोर्ट CSIR द्वारे देशभरातून करण्यात आलेल्या सीरोपॉझिटिव्ह सर्व्हेच्या आधारावर आहे.3 / 9CSIR रिपोर्ट हे दाखवतो की, शाकाहारी लोकांच्या तुलनेत मांस खाणाऱ्या लोकांना कोविड-१९ च्या धोक्याची अधिक शक्यता आहे. हा दावा देशभरातील साधारण १० हजार लोकांच्या सॅम्पल साइजवर आधारित आहे. ज्याचं विश्लेषण १४० डॉक्टर्सच्या टीमने केलंय. यात असं आढळून आलं की, मांस खाणाऱ्या कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या व्हेजिटेरिअन लोकांपेक्षा जास्त आहे. आणि व्हेजिटेरिअन डाएटमध्ये हाय फायबर हेच या मोठ्या अंतराचं कारण आहे. 4 / 9फायबरयुक्त डाएट अॅंटी-इन्फ्लेमेटरी असते ज्याने इन्फेक्शननंतर गंभीर स्थिती टाळली जाऊ शकते. तसेच इन्फेक्शनला शरीरावर हल्ला करण्यापासूनही रोखलं जाऊ शकतं. सर्व्हेत असंही सांगण्यात आलं आहे की, कोरोना संक्रमणाच्या सर्वाधिक केसेस AB ब्लड ग्रुपच्या समोर आल्या आहेत. तर B ब्लड ग्रुपमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका थोडा कमी आहे. तसेच O ब्लड ग्रुपच्या लोकांमध्ये सर्वात कमी सीरोपॉझिटिविटी आढळून आली.5 / 9आग्र्यातील प्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. अशोक शर्मा यांनी इंडिया टुडेसोबत बोलताना सांगितले की, हे सगळं व्यक्तीच्या जेनेटिक स्ट्रक्चरवर अवलंबून आहे. एका उदाहरण देत ते म्हणाले की, 'थॅलेसीमिया(रक्तासंबंधी एक आनुवांशिक आजार) चे लोक मलेरियाने फार कमी प्रभावित होतात. असं अनेक केसेसमध्ये बघण्यात आलं की, घरातील एखाद्या सदस्याला सोडून इतर सर्वांना कोरोनाची लागण झाली आहे. असं जेनेटिक स्ट्रक्चरमुळे होतं'.6 / 9डॉ. शर्मा म्हणाले की, 'अशी शक्यता आहे की, या व्हायरस विरोधात O ब्लड ग्रुपच्या लोकांचं इम्यून सिस्टीम AB आणि B ब्लड ग्रुपच्या लोकांच्या तुलनेत जास्त चांगला रिस्पॉन्स करत असेल. असं असलं तरी यावर आणखी शोध करण्याची गरज आहे. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की, O ब्लड ग्रुपच्या लोकांना कोविडपासून बचावासाठी सर्व प्रोटोकॉलचं पालन बंद करावं. ते म्हणाले की, O ब्लड ग्रुपचे लोकही व्हायरसपासून पूर्णपणे सुरक्षित नसतात आणि त्यांच्यातही गंभीर लक्षणे विकसित होत आहेत'.7 / 9CSIR च्या या सर्व्हेवर फिजिशिअन डॉ. एसके कालरा म्हणाले की, 'हा केवळ सर्व्हेक्षणाचा नमूना आहे. हा काही सायंटिफिक रिसर्च पेपर नाही ज्याचा रिव्ह्यू झाला. वैज्ञानिकांच्या सल्ल्याशिवाय वेगवेगळ्या ब्लड ग्रुपच्या लोकांमध्ये संक्रमणाचा दर कसा ठरवला जाऊ शकतो. O ब्लड ग्रुपच्या लोकांमध्ये संक्रमणासोबत लढण्यासाठी चांगली इम्यूनिटी असते, हे सांगणं सध्या घाईचं होईल'. 8 / 9कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंत लोकांना हादरवून सोडलं आहे. स्मशानभूमीसमोर मृतदेहांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. गंगा नदीत मृतदेह सोडले जात आहेत. संक्रमित लोकांचे मृतदेह अंत्यसंस्कार न करता नदीत सोडले जात आहेत. बिहारमध्ये अशा घटना बघितल्या जात आहेत.9 / 9दरम्यान दिलासादायक बाब ही आहे की, कोविड रूग्णांचा रिकव्हरी रेट पुन्हा एकदा वाढला आहे. गेल्या २४ तासात देशात साधारण ३.५५ लाखांपेक्षा जास्त लोक कोरोनाला मात देऊन ठीक झाले आहेत. इतकंच नाही तर अॅक्टिव केसेसही कमी झाल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications