शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus: धोकादायक! जाणून घ्या, १ कोरोना रुग्ण किती जणांना बनवतो शिकार? डॉक्टरांनी दिला आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 12:31 PM

1 / 10
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगासमोर संकट उभं राहिलं आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रत्येक देश आपापल्यापरीने प्रयत्न करत आहेत. चीन, इटली, स्पेन, अमेरिका या देशांना कोरोनाचा फटका सर्वाधिक बसला आहे.
2 / 10
भारतातही कोरोनाचे ५५० हून अधिक रुग्ण आढळले आहेत तर ११ जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या साडेचार लाखांहून अधिक आहे. तर १८ हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
3 / 10
कोरोनाचं संकट टाळण्यासाठी प्रत्येक देशाने लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. भारतातही २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आलं आहे. लोकांनी घराबाहेर पडू नका असं आवाहन करण्यात आलं आहे.
4 / 10
वाऱ्यासारख्या पसरणाऱ्या या व्हायरसबाबत अनुभवी डॉक्टरने सांगितले की, कोरोनाचा एक पीडित रुग्ण ५९ हजार लोकांना संक्रमित करु शकतो. यूनिवर्सिटी कॉलेज ऑफ लंडनचे प्रोफेसर डॉ. ह्यू मॉन्टगोमरी यांनी असा दावा केला आहे.
5 / 10
कोरोना व्हायरस सर्वाधिक वेगाने पसरणारा व्हायरस आहे. एका रुग्णामुळे हा व्हायरस हजारो लोकांना होऊ शकतो. त्यामुळे लोकांनी सोशल डिस्टेंसिंग राखणं गरजेचे आहे.
6 / 10
सामान्य तापात हा व्हायरस एकापासून पासून ३ अथवा ४ व्यक्तिंना संक्रमित करतो. संक्रमित व्यक्तीकडून पुढे दहापटीने हा व्हायरस वाढत जातो.
7 / 10
कोरोना व्हायरसचं सक्रमण अधिक गतीने होऊ शकते. कारण गर्दीच्या ठिकाणी कोरोना संक्रमित व्यक्ती हजारोंच्या संपर्कात येते.
8 / 10
कोरोना व्हायरसचं संक्रमण १ पासून ३ होतं. त्यानंतर दहाच्या पटीने ते वाढत जातं त्यामुळे ५९००० लोकांना कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. उदा. १ पासून ३, ३ ते ९, ९ ते २७, २७ ते ८१, ८१ ते २४३, २४३ ते ७२९, ७२९ ते २१८७, २१८७ ते ६५६१, ६५६१ ते १९६८३, १९६८३ ते ५९,०४९ लोकांपर्यंत पोहचू शकतो असं डॉक्टरांनी सांगितले.
9 / 10
कोरोना व्हायरसच्या आकडे कितीही भयावह असले तरी लपवू शकत नाही. संक्रमित रुग्णामुळे अनेक लोकांना याची लागण होईल त्यातील काही लोकांना आयसीयूमध्ये ठेवावं लागेल तर काही लोक आजारी पडतील. मात्र जे आजारी पडले नाहीत त्यांच्यामुळेही व्हायरसचा प्रसार होऊ शकतो असं ह्यू यांनी सांगितले.
10 / 10
त्यामुळे कोरोनाची लागण होण्यापासून वाचायचं असेल तर घराबाहेर पडू नका, लोकांच्या संपर्कात आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका असं वारंवार सांगितले जात आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या