शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : फुप्फुसांवर कसा अटॅक करतो डेल्टा प्लस व्हेरिएंट? तिसऱ्या लाटेबाबत वाढली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2021 12:05 PM

1 / 10
कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे जगभरात चिंतेचं वातावरण आहे. हा व्हेरिएंट फुप्फुसांच्या कोशिकाच्या रिसेप्टरवर इतक व्हेरिएंटच्या तुलनेत जास्त वेगाने चिकटतो. पण याचा अर्थ हा अजिबात नाही की, या व्हेरिएंटची लक्षणे गंभीर होतील किंवा हा व्हेरिएंट जास्त संक्रामक असेल. नॅशनल टेक्नीकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑफ इन्यूनायजेशन इन इंडिया (NTAGI) चे प्रमुख डॉ. एनके अरोरा यांनी याची माहिती दिली.
2 / 10
कोरोना व्हायरसच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची ओळख ११ जूनला पटली होती आणि आता याला 'व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' च्या रूपात लिस्टेड करण्यात आलं आहे. भारतातील १२ राज्यांमध्ये आता डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रूग्ण सापडले आहेत. भारतात एकूण ५१ रूग्ण आहेत. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे सर्वात जास्त रूग्ण महाराष्ट्रात आहेत.
3 / 10
NTAGI चे चेअरमन म्हणाले की, 'डेल्टा प्लस व्हेरिएंट इतर स्ट्रेनच्या तुलनेत फुप्फुसाच्या कोशिकांमध्ये लवकर जुळतो. तो फुप्फुसातील म्यूकस लायनिंगसोबत लवकर कनेक्ट होतो. पण याचा हा अर्थ काढणं योग्य ठरणार नाही की, हा व्हेरिएंट जास्त संक्रामक आणि आजाराला घातक रूप देणार आहे'
4 / 10
डॉ. अरोरा म्हणाले की, डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत स्पष्टपणे तेव्हाच सांगता येईल जेव्हा याच्या आणखी केसेस समोर येतील. सध्याच्या केसेस पाहता असं वाटत आहे की, वॅक्सीनचा सिंगल किंवा डबल डोज घेतलेल्या लोकांमध्ये याचं संक्रमण हलकं राहतं. ते म्हणाले की, याच्या ट्रान्समिशनवर लक्ष ठेवावं लागेल, जेणेकरून पसरणाऱ्या इन्फेक्शनची माहिती मिळेल.
5 / 10
ते म्हणाले की, डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या केसेसची संख्या नोंदवल्या गेलेल्या संख्येपेक्षा जास्त असू शकते. कारण याचे शिकार झालेले अनेक लोक एसिम्प्टोमॅटिकही असू शकतात. त्यामुळे रूग्णात भलेही लक्षणे दिसत नसली तरी, ते संक्रमण पसरवू शकतात.
6 / 10
डॉ. अरोरा म्हणाले की, 'हे महत्वाचं आहे की, जीनोमिकबाबत आमचं काम फार वेगवान झालं आहे आणि आम्ही योग्य दिशेने पुढे जात आहोत. राज्यांना आधीच सूचना दिल्या गेल्या आहे की, हा एक चिंताजनक व्हेरिएंट आहे आणि आपल्याला तयार राहण्याची गरज आहे'.
7 / 10
डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते का? या प्रश्नावर डॉक्टर म्हणाले की, 'सद्या स्थिती पाहता याबाबत काही सांगता येणं योग्य ठरणार नाही. महामारीच्या लाटा नवीन व्हेरिएंट आणि नव्या म्यूटेशनशी संबंधित असतात. हा नवा व्हेरिएंट आहे त्यामुळे याची शक्यता असू शकते. पण हा व्हेरिएंट तिसऱ्या लाटेचं कारण ठरेल का ही बाब तीन-चार गोष्टीवर अवलंबून आहे.
8 / 10
पहिली बाब ही की, गेल्या तीन महिन्यांपासून आपण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहोत. दुसरी लाट अजूनही सुरूच आहे. गेल्या ८ ते १० दिवसात नव्या रूग्णांची संख्या ५० हजारावर आहे. काही ठिकाणी तर सतत केसेस वाढत आहेत. म्हणजे दुसरी लाट पूर्णपणे संपलेली नाही.
9 / 10
ते म्हणाले की, तिसरी लाट यावर अवलंबून असेल की, दुसऱ्या लाटेत लोकसंख्येचा किती भाग संक्रमित झाला. जर लोक मोठ्या संख्येने संक्रमित झाले असतील तर त्यांना सर्दी-खोकला यांसारखीच लक्षणेच जाणवू शकतात. कदाचित आता या आजाराचं घातक रूप बघायला मिळणार नाही.
10 / 10
दुसरी बाब म्हणजे लोकांना वेगाने वॅक्सीनेट करणंही गरजेचं झालं आहे. मग त्यांना डोज मिळाला तरी चालेल. जर आपण लवकर इम्यूनाइज झालो तर शक्य आहे की तिसऱ्या लाटेत नुकसान कमी होईल. येणारी लाट जर आपण शांत ठेवली तर गेल्या दोन लाटेसारखं नुकसान होणार नाही.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHealthआरोग्य