शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus : मागील २० वर्षात 'या' तीन प्राण्यांमुळे पसरली होती महामारी, लाखो लोकांचा झाला होता मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2020 12:50 PM

1 / 10
झपाट्याने पसरत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. आज आम्ही तुम्हाला कोरोना व्हायरसची भीती घालवण्यासाठी अशा काही गोष्टी सांगणार आहोत. कारण कोरोनाच नाही तर मागील वीस वर्षात अनेक व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे जीवघेण्या आजारांचा सामना लोकांना करावा लागला आहे.
2 / 10
२००२ मध्ये चीनमध्ये सार्स या आजारामुळे माहामारी पसरली होती. त्यामुळे जवळपास ९१ हजार लोकांना संक्रमणाचा सामना करावा लागाला होता. तसंच ३ हजार १२० लोकांचा मृत्यू झाला होता.
3 / 10
त्यानंतर २०१२ मध्ये मर्स नावाच्या व्हायरसने २ हजार ४९४ लोकांना संक्रमित केलं होतं. त्यामुळे ८५८ लोकांचा मृत्यू झाला होता.अलिकडे कोविड १९ या आजाराने जवळपास २०१९ पासून १४ लाखांपेक्षा अधिक लोकांना आपलं शिकार बनवलं आहे. त्यामुळे मृत्यू होत असलेल्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
4 / 10
कॉमन कोल्ड, सार्स, मर्स आणि कोरोना व्हायरस हे चार ही आजार एका फॅमिलीतून म्हणजेच कोरोना विरिडे (Corona Viridae) या प्रकारात येतात. यात सिंगल स्ट्रेंडेट व्हायरस कोरोना व्हायरस मोठ्या जिनोम ला कॅरी करत असतो. कॉमन कोल्ड म्हणजेच सर्दी, खोकला यांचा इंक्युबेशन पिरियड साधारणपणे दोन दिवसांचा असतो.
5 / 10
सार्स कसा निर्माण झाला होता : सार्स व्हायरस चीनी हॉर्स शू म्हणजे वाटवाघुळ या प्राण्याच्या माध्यामातून पसरला होता. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर जवळपास सर्वच वटवाघळांना मारून टाकण्यात आलं होतं. त्यानंतर सार्समुळे मृत्यू होत असलेल्यांची संख्या कमी झाली.
6 / 10
मर्स कसा निर्माण झाला होता: मर्स हा आजार अरबमधील उंटांमध्ये दिसून आला होता. त्यानंतर वटवाघूळांमध्ये हा आजार पसरून त्यानंतर माणसांमध्ये आला. त्यानंतर झालेल्या अभ्यासात असं दिसून आलं होतं की अरेबियन उंट मर्स व्हायरसचे रिजरवॉटर होस्ट होते. हा आजार उंटांमध्ये श्वासांमार्फत पसरत होता.
7 / 10
कोरोना कसा पसरला : कोरोना व्हायरस वटवाघळामुळे पसरला आहे अशी शक्यता वर्तवली जाते. आत्तापर्यंतच्या रिसर्चमध्ये पॅगोलिनमुळे सार्स कोविड १९ इंटरमिडियट होस्ट आहे. त्यामुळे व्हायरस मानवी शरीरात प्रवेश करतो.
8 / 10
चीनच्या वुहान शहरातून कोरोना हा जगभरात पसरला आहे. अद्याप कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं नाही.
9 / 10
कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जगावर मोठं संकट आलं आहे. दिवसेंदिवस मृत्यू होत असलेल्या लोकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे संशोधक कोरोनाची लस शोेधण्याच्या प्रयत्नात आहेत.
10 / 10
कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण जगावर मोठं संकट आलं आहे. दिवसेंदिवस मृत्यू होत असलेल्या लोकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे संशोधक कोरोनाची लस शोेधण्याच्या प्रयत्नात आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य