भारतात तयार होत आहे कोविड19 चे औषध; जाणून घ्या डोस, किंमत याबाबत ८ महत्वाच्या गोष्टी By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 11:09 AM
1 / 9 कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरातील शास्त्रज्ञ लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतातील बजारात कोरोना संक्रमणाच्या उपचारांसाठी पहिलं औषध निश्चित करण्यात आलं आहे. ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स कंपनीला कोविड-19 च्या उपचारांसाठी एंटीवायरल औषध फेविपिराविरच्या निर्मीतीची आणि मार्केटिंगची परवागनी देण्यात आली आहे. 2 / 9 फेविपिराविरला फॅबिफ्लू नावाने ओळखले जाते. कोरोनाच्या माहामारीत या औषधाने आशेचा किरण दाखवला आहे. या औषधाबाबत महत्वपूर्ण माहिती देणार आहोत. 3 / 9 कंपनीने दिलेल्या माहितीनुसार संक्रमण झालेल्या रुग्णांव्यतिरिक्त डायबिटीस आणि हृदयाच्या आजारांनी पिडीत असलेल्या लोकांनाही हे औषध दिलं जाऊ शकतं. टॅबलेटच्या स्वरुपात हे औषध उपलब्ध असेल. त्यामुळे रुग्णांलयांवर येणारा अतिरिक्त भार कमी केला जाऊ शकतो. 4 / 9 डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारचं हे औषध दिले जाणार आहे. पहिल्या दिवशी १८०० एमजीचा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांपर्यंत ८०० एमजी चा डोस घ्यायचा आहे. 5 / 9 ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने दिलेल्या माहितीनुसार हे औषध टॅबलेट स्वरुपात उपलब्ध असणार आहे. एका पाकिटात ३४ गोळ्या असतील. या पाकीटाची किंमत ३ हजार ५०० रुपये असेल म्हणजेच एक गोळी १०३ रुपयांना मिळेल. हे एक एंटी व्हायरल औषध आहे. 6 / 9 या औषधाच्या उत्पादनाबाबत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार ८२ हजार ५०० रुग्णांना हे औषध उपलब्ध करून दिलं जाणार आहे. माहामारीच्या काळात कंपनी या औषधाचे उत्पादन वाढवण्याच्या तयारीत आहे. 7 / 9 या औषधाचे उत्पादन गुजरातमधील अंकलेश्वर येथे होत आहे. एक्टिव फार्मास्युटिकल इन्ग्रिडिएंट (एपीआई) चे उत्पादन सुरू आहे. हिमाचल प्रदेशातही या औषधांचे उत्पादन केले जात आहे. हे औषध वेगवेगळ्या कोविड रुग्णालयांना पुरवण्यात येणार आहे. 8 / 9 या औषधाच्या निर्मीती आणि विपणनासाठी DGCI ने परवागनी दिली आहे. या औषधाच्या वापराने कोरोना रुग्णांवर उपचार करणं सहज शक्य होऊ शकते. तसंच या औषधामुळे मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. 9 / 9 कोरोनाच्या माहामारीत या कंपनीच्या औषधाने आशेचा किरण दाखवला आहे. लवकरच चांगले दिवस येतील अशी आशा तज्ज्ञांना आहे. सुरूवातीला देशातील रुग्णांच्या गरजा पूर्ण केल्यानंतर औषधांच्या निर्यातीवर विचार करण्यात येईल अशी माहिती कंपनीतील तज्ज्ञांनी दिली. आणखी वाचा