Coronavirus enters in erectile cells of penis causes erectile dysfunction says report
Coronavirus : निगेटिव्ह झाल्यावर पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घर करतोय कोरोना, रिसर्चमधून धक्कादायक खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 11:13 AM1 / 10कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांना नंतर वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात तर अनेक गंभीर समस्या आहेत. अशीच एक समस्या पुरूषांना शिकार करत आहे. एका नव्या रिसर्चमधून धक्कदायक खुलासा करण्यात आला आहे की, रिकव्हरीनंतरही कोरोना व्हायरस पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जाऊ घर बनवत आहे. ज्यामुळे पुरूषांना इरेक्टाइल डिस्फंशनची(ताठरता) समस्या होत आहे. रिसर्चनुसार, कोरोना व्हायरस पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टच्या आतील इरेक्टाइल कोशिकांवर ताबा मिळवतो. याने पुरूषांच्या लैंगिक क्षमतेवर वाईट प्रभाव पडत आहे. 2 / 10मियानी यूनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी दोन पुरूष कोरोना रूग्णांच्या प्रायव्हेट पार्टचं स्कॅन केलं. हे स्कॅनिंग या पुरूषांच्या रिकव्हरीच्या ६ महिन्यांनंतर करण्यात आलं. या टेस्टमधून समजलं की, त्यांच्या प्रायव्हेट पार्टच्या आतील इरेक्टाइल सेल्समध्ये कोरोना व्हायरस घर करून बसला आहे. ज्यामुळे पुरूषांना इरेक्टाइल डिस्फंशनची समस्या होत आहे. 3 / 10यातील एक पुरूष गंभीर रूपाने कोरोना संक्रमित होता. तो हॉस्पिटलमध्ये भरती होती. तेथून रिकव्हर झाला. तर दुसऱ्याला माइल्ड संक्रमण होतं. मात्र, दोघांसोबतही ही समस्या होत आहे. वेगळे एक्सपर्ट्स म्हणाले की हे पहिल्यांदाच समोर आलं की, कोरोना व्हायरस पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टवर ताबा मिळवत आहे. हे एक खतरनाक लक्षण आहे.4 / 10जगभरातील लोकांना माहीत आहे की कोरोना व्हायरस रक्तनलिकांना नुकसान पोहोचवतो. सोबतच तो शरीरातील अवयवांना खराब करतो. जर याने पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टमध्ये होत असलेला रक्त पुरवठा रोखला तर ते कधीही शरीरसंबंध ठेवू शकणार नाहीत. हा रिसर्च करणारे वैज्ञानिक डॉ. रंजीत रामासामी यांनी सांगितले की, ज्या पुरूषांना आधी ही समस्या नव्हती. त्यांना कोरोना संक्रमण झाल्यावर इरेक्टाइल डिस्फंशनची गंभीर समस्या होत आहे.5 / 10डॉ. रंजीत रामासामी दोन पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टचं स्कॅनिंग फार खोलवर केलं. त्यांनी कोशिकांचे फोटो १०० नॅनोमीटर्स स्तरावर घेतले. त्यानंतर कोशिकांवर कोरोना व्हायरस दिसला. त्यासोबतच PCR टेस्टही केली. रिकव्हरीनंतरही ते कोरोना पॉझिटिव्ह निघाले. डॉ. रंजीत आणि त्यांच्या टीमने सांगितलं की, या व्हायरसपासून बचावाचे दोन उपाय आहेत. पहिला वॅक्सीन आणि दुसरा प्रोटोकॉल फॉलो करा. दोन महिन्यांआधी रोम यूनिव्हर्सिटीमधूनही असाच एक रिसर्च समोर आला होता.6 / 10रोम यूनिव्हर्सिटीच्या डॉक्टरांनी १०० पुरूषांच्या फर्टिलिटीची टेस्ट केली होती. यातील २८ टक्के पुरूषांना इरेक्टाइल डिस्फंशन म्हणजे ताठरतेची समस्या दिसून आली. तर सामान्य स्तरावर ९ टक्के लोकांना ही समस्या दिसली. म्हणजे त्यांना कोरोना व्हायरस संक्रमण नव्हतं. डॉक्टर १०० लोकांसोबत बोलले. यांचं वय सरासरी ३३ होतं. यातील २८ पुरूषांना इरेक्टाइल डिस्फंशनची समस्या येत होती. पण ज्यांना कोरोना झाला नाही त्यापैकी ९ टक्के लोकांनाच ही समस्या होती. म्हणजे सामान्य पुरूषांच्या तुलनेत कोरोना संक्रमित पुरूषांमध्ये इरेक्टाइल डिस्फंशनची समस्या तीन पटीने जास्त आहे. 7 / 10वैज्ञानिकांचं मत आहे की, कोरोना व्हायरस एंडोथेलियममध्ये सूज निर्माण करतो. हा रक्तनलिकेच्या आतील एक थर असतो हा थर संपूर्ण शरीरात असतो. ज्या नसा पुरूषांच्या प्रायव्हेट पार्टला रक्त सप्लाय करतात, त्या फार छोट्या आणि बारीक असतात. अशात जर कशाप्रकारची सूज आली तर सप्लाय बंद होतो. याने लैंगिक जीवनावर प्रभाव पडतो.8 / 10पुरूषांबाबत कोरोना व्हारसच्या होणाऱ्या परिणामांबाबत हा नवा रिसर्च आहे. ही बाब तर प्रमाणित झाली आहे की, कोरोना व्हायरसचा वाईट प्रभाव महिलांच्या तुलनेत पुरूषांवर जास्त पडत आहे. पुरूष अधिक वेगळ्या आजारांनी ग्रस्त होत आहेत.9 / 10असं असलं तरी काही रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे की, इरेक्टाइल डिस्फंशन आणि कोरोना व्हायरसचा संबंध लैंगिक इच्छा जागृत करणाऱ्या इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन हार्मोन्सच्या स्तरावरही अवलंबून असतो. यूनायटेड किंगडममध्ये कोरोना महामारी सोडून सामान्यपणे महिला पुरूषांच्या तुलनेत ३.७ वर्ष जास्त जगतात. यामागचं कारण इस्ट्रोजेन हार्मोन ज्यामुळे त्यांचं इम्यून सिस्टीम मजबूत राहतं. 10 / 10जर टेस्टोस्टेरॉनचं प्रमाण वाढलं तरी कार्डिओवस्कुलर सिस्टीममध्ये अनेक प्रकारचे आजार होण्याची शक्यता वाढते. कोरोना व्हायरसच्या संक्रमणानंतर याचा धोका वाढतो. नुकताच एक रिसर्च समोर आला होता ज्यात न्यूयॉर्क येथील इकान स्कूल ऑफ मेडिसिनच्या प्रोफेसर शान्ना स्वान म्हणाल्या होत्या की, काही खास प्रकारच्या रसायनामुळे पुरूष वडील बनण्याची क्षमता गमावत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications