शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: धोका वाढला! कोरोना विषाणूनं शरीरात प्रवेश करण्याचा नवा मार्ग शोधला

By कुणाल गवाणकर | Published: October 27, 2020 9:39 AM

1 / 10
देशातील कोरोना रुग्णांची संख्या ८० लाखांच्या जवळ पोहोचली आहे. आतापर्यंत ७१ लाखांपेक्षा अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे.
2 / 10
कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट ९० टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी झाला आहे.
3 / 10
देशात दररोज आढळून येणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक घट होत आहे. गेल्या ३ आठवड्यांपासून कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे.
4 / 10
एकीकडे कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होत असताना आता कोरोनाबद्दलच्या एका संशोधनानं सगळ्यांचीच चिंता वाढवली आहे. कोरोनानं मानवी शरीरात प्रवेश करण्याचा नवा मार्ग शोधून काढला आहे.
5 / 10
कोरोनाचा विषाणू एका प्रोटीनच्या मदतीनं शरीरात प्रवेश करत असल्याचं संशोधनातून समोर आलं आहे. सायन्स जर्नलमध्ये याबद्दलचा तपशील प्रसिद्ध झाला आहे.
6 / 10
कोरोना विषाणूच्या आकार लक्षात घेतल्यास त्याची बाहेरील बाजूंना टोकदार काटे असतात. या काट्यांवर एक विशेष प्रकारचं प्रोटीन असतं.
7 / 10
कोरोनाच्या बाहेरील बाजूस असणारं प्रोटीन मानवी शरीरात असलेल्या कोशिकांमधील प्रोटीन एसीई-२ च्या संपर्कात येतात.
8 / 10
कोरोना विषाणू मानवी कोशिकांच्या आत शिरतो. त्यानंतर विषाणूंची संख्या वाढते. हळूहळू विषाणू संपूर्ण शरीरात पसरून कब्जा करतो.
9 / 10
संशोधकांनी याबद्दल दोन संशोधनं प्रसिद्ध केली. या दरम्यान मानवी कोशिकांमध्ये न्युरोपिलिन-१ नावाचं प्रोटिन आढळून आलं. हे प्रोटीन कोरोना विषाणूला सकारात्मक प्रतिसाद देतं.
10 / 10
इंग्लंडमधील ब्रिस्टल विद्यापीठाच्या संशोधकांनी न्युरोपिलिन-१ नावाचं प्रोटीन कोरोना विषाणूला मदत करत असल्याचा शोध लावला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या