Coronavirus evolving to become more airborne says new study
हवेतून वेगाने पसरण्यासाठी स्वत:ला विकसित करत आहे कोरोना व्हायरस, रिसर्चमधून धक्कादायक दावा By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 2:34 PM1 / 10कोरोना व्हायरस स्वत:ला आणखी जास्त शक्तीशाली बनवत आहे, जेणेकरून त्याला हवेतून अधिक जास्त पसरता येईल. हा खुलासा एका नव्या रिसर्चमधून करण्यात आला आहे. यात वैज्ञानिकांनी सांगितलं की, लोक श्वास घेताना, बोलताना आणि गाताना किंवा कोणत्याही क्षणी नाक आणि तोंडाने हवेतील एअरोसोलला आत खेचतात. ज्यात ओलावा असलेले थेंब असतात. यांच्यासोबतच कोरोना व्हायरसही शरीरात प्रवेश करतो. आधीही कोरोना हवेच्या माध्यमातून पसरत होता. पण आता तो हवेच्या माध्यमातून लोकांना अधिक संक्रमित करण्याची आपली क्षमता वाढवत आहे.2 / 10या नव्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, जगभरातील सर्वच कोरोना रूग्णांपैकी ८५ टक्के लोकांच्या शरीरात कोरोना व्हायरस RNA मिळाला आहे. हा RNA रूग्णांच्या श्वासांच्या माध्यमातून एअरोसोलसोबत शरीरात शिरला आहे. यांचा आकार पाच मायक्रोमीटरपेक्षाही कमी आहे. हा रिसर्च नुकताच क्लीनिकल इंफेक्शिअस डिजीसेस जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. हा रिसर्च सिंगापूरच्या वैज्ञानिकांनी केला आहे. ज्यात दावा करण्यात आला आहे की, कोरोना व्हायरस आता पुन्हा स्वत:ला हवेतून पसरण्यासाठी अधिक मजबूत करत आहे. 3 / 10असाच एक रिसर्च यूनिव्हर्सिटी ऑफ मेरीलॅंडच्या वैत्रानिकांनी डोनाल्ड मिल्टन आणि त्यांच्या टीमने केला आहे. त्यांना आढळून आलं की, अल्फा व्हेरिएंट कोरोना रूग्णांच्या श्वासांमधून एअरोसोलच्या माध्यमातून १८ टक्क्यांनी जास्त गेला आहे. तर इतर कोरोना व्हेरिएंटचा प्रभाव अल्फाच्या तुलनेत कमी होता. हा रिसर्चही नुकताच medRxiv.org वर प्रकाशित झाला. पण या रिसर्चचा अजून रिव्ह्यू झालेला नाही. सोबतच असंही सांगण्यात आलं की, जर कुणी मास्क सैल घातला तर कोरोनापासून बचाव अर्धाच होतो. कारण सैल मास्कमधून कोरोना व्हायरस एअरोसोलच्या माध्यमातून नाक किंवा तोंडाच्या मार्गे शरीरात जातात.4 / 10केवळ इतकंच यूनिव्हर्सिटी ऑफ मेरीलॅंडच्या वैज्ञानिकांनी हवेत मिसळलेल्या एअरोसोलच्या माध्यमातून कोरोना व्हायरस लॅबमध्ये विकसित केला. ज्यातून समजलं की, हवेसोबत वाहत असलेल्या एअरोसोलमध्ये कोरोना व्हायरसचे RNA फार जास्त वेगाने लोकांना संक्रमित करतात. एअरोसोलबाबत जगभरात चर्चाही होत आहे. 5 / 10एप्रिल २०२१ मध्ये WHO ने याबाबत मान्यता देत जगभरातील लोकांना वॅक्सीन घेतल्यावरही मास्क लावण्याची सूचना केली होती. अमेरिकेतील सीडीसीनेही एअरोसोलच्या माध्यमातून कोरोना व्हायरस पसरतो हे मान्य केलं होतं. माकडांवर करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, जास्तीत जास्त व्हायरस एअरोसोलच्या माध्यमातूनच शरीरात प्रवेश करतात. पण काही वैज्ञानिकांना हे मान्य नाही.6 / 10व्हर्जिनिया टेकमध्ये काम करणाऱ्या पर्यावरण इंजिनिअर लिन्से मार म्हणाल्या की, याचे अनेक पुरावे आहेत की, हवेतून कोरोना व्हायरस पसरतो. लिन्से मार त्या २०० वैज्ञानिकांमध्ये सामिल होत्या, ज्यांनी WHO ला पत्र लिहिलं होतं. लिन्से म्हणाल्या की, एअरबॉर्न शब्द हा धोकादायक असल्याचं आधीच कळून येतं. कोरोनापासून बचावासाठी रूग्णासाठी वेगळी रूम, डॉक्टरांसाठी हॅजमॅट सूट, महागडे यंत्र इत्यादी मदत करतात.. पण कुणी श्वास घेणं तर बंद करू शकत नाही.7 / 10लिन्से म्हणाल्या की, जास्तीत जास्त कोरोना व्हायरसच्या केसेस जवळच्या लोकांमध्ये झालेल्या संक्रमणामुळेच समोर आल्या आहेत. संक्रमित व्यक्तीच्या नाकातून किंवा तोंडातून निघणारे ड्रॉपलेट्स किंवा थेट संक्रमित हवेला श्वासाद्वारे आत घेतल्याने कुणालाही कोरोनाची लागण होऊ शकते. पण वैज्ञानिक या गोष्टीमुळे चिंतेत आहे की, काय खरंच हवेतून कोरोना व्हायरस वेगाने पसरतो. 8 / 10नॅशनल यूनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरमध्ये मेकॅनिकल इंजिनिअर वॉक वाई थामने यांनी समोर आणलं की, कोरोना संक्रमित व्यक्ती आपल्या श्वासातून, शिंकेतून किंवा खोकल्यातून किती कोरोना व्हायरस असलेला एअरोसोल हवेत पसरवते. त्यांनी एक मोबाइल लॅब तयार केली. आणि २२ रूग्णांना भेटले. त्यांना एका धातुच्या कोनात आपलं तोडं टाकण्यास सांगितलं. जेणेकरून हे समजावं की संक्रमित व्यक्तीच्या श्वासासोबत किती कोरोना व्हायरस हवेत मिळाले.9 / 10वॉक वाई थाम यांनी कोरोना संक्रमित रूग्णांना ३० मिनिटे या धातुच्या कोनात आपलं तोंड टाकून श्वास घेण्यास सांगितलं. यादरम्यान वॉक वाईने त्यांच्या श्वासातून निघालेले आणि आत जाणारे एअरोसोल व थेंबाचे सॅम्पल जमा केले. सोबतच रूग्णांना सांगितलं की, तुम्ही एबीसीडी म्हणा. ह रूग्णांना १५ मिनिटे करायचं होतं. वॉकने यावेळी रूग्णांच्या श्वासातन निघणारे न्यूक्लिओकॅप्सिड प्रोटीन जीनचं प्रमाण चेक केलं. यांना N Gene असंही म्हणतात. याने समजतं की, किती व्हायरस शरीरात गेले आणि निघाले.10 / 10२२ रूग्णांमध्ये १३ नी कोरोना व्हायरसचे RNA मोठ्या प्रमाणात आपल्या श्वासातून घेतले आणि सोडले. जर कोरोना संक्रमित रूग्णाने गाणं गायलं तर तो कोरोनाने भरलेले एअरोसोल जास्त सोडतो. वेगवेगळ्या लोकांचा वेगवेगळा स्पीड आहे. त्यामुळे एअरोसोल बाहेर आला. आणखी वाचा Subscribe to Notifications