शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Coronavirus : एक नाही तर 8 मीटरपर्यंत पसरू शकतो कोरोना व्हायरस, आता बचावासाठी करा 'हा' उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 3:43 PM

1 / 9
कोरोना व्हायरसचं संक्रमण भारतातही वेगाने पसरत आहे आणि हे रोखण्यासाठी 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. पण तरी सुद्धा कोरोनाची लागण झालेल्या अनेक केसेस वाढल्या आहेत. मात्र, इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण कमीच आहे. दरम्यान संक्रमणापासून बचावासाठी तयार करण्यात आलेल्या सोशल डिस्टेंसिंगवर नवीन गाइडलाईनची वाट पाहिली जात आहे.
2 / 9
अशात एक रिसर्च समोर आला असून त्यात 1 एप्रिल 2020 ला कोरोना व्हायरस पसरण्याच्या अंतराबाबत रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. त्यात लोकांनी एकमेकांपासून किती अंतर ठेवावं या नियमात एक बदल केला आहे. त्यानुसार आपण सर्वांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. (रिपोर्ट https://www.ibtimes.sg/social-distancing-failure-expert-says-coronavirus-can-travel-8-metres-42219 या लिंकवर वाचू शकता)
3 / 9
कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा सर्वात वाईट प्रभाव अमेरिकेवर बघायला मिळत आहे आणि हेच कारण आहे की, या व्हायरसला मात देण्यासाठी वैज्ञानिक शक्य तेवढे प्रयत्न करत आहेत. अशात डॉक्टरांनी कोरोना व्हायरसचं संक्रमणाबाबत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, व्हायरसचं संक्रमण किती दूरपर्यंत पसरू शकतं. हे जाणून घेण्यासाठी त्यांनी रिसर्च केला.
4 / 9
अमेरिकेत सुरू झालेल्या या रिसर्चमध्ये विशेष डॉक्टरांची एक टीम होती आणि त्यांनी यावर खोलवर अभ्यास केला. त्यानंतर त्यातून जे निष्कर्ष समोर आलेत ते सोशल डिस्टेंसिंगसाठी ठरवण्यात आलेल्या अंतराबाबत चिंता जाहीर करणारे होते.
5 / 9
कसा केला रिसर्च? - कोरोना व्हायरसचं संक्रमण पसरण्याचं योग्य अंतर जाणून घेण्यासाठी डॉक्टरांच्या टीमने चांगल्या लेजर टेक्निक आणि कॅमेरांचा वापर केला गेला. रिसर्चमध्ये अशा लोकांना सहभागी करून घेण्यात आले ज्यांच्यात खोकल्याची आणि शिंकांची लक्षणे होती.
6 / 9
त्यानंतर या लोकांनावर बरेच दिवस अभ्यास करण्यात आला. त्यातून असं दिसून आलं की, जेव्हा हे लोक खोकतात किंवा शिंकतात तेव्हा त्यांच्या तोंडातून निघणारे ड्रॉपलेट्स(थेंब) ज्यात व्हायरस असू शकतात, ते केवल एक किंवा 3 मीटर अंतरावरच नाही तर त्यापुढेही जाऊ शकतात.
7 / 9
कोरोना व्हायरसच्या संक्रमणावर जारी करण्यात आलेल्या नव्या रिसर्चमध्ये सांगण्यात आलं आहे की, हा व्हायरस साधारण 8 मीटर अंतरापर्यंत जाऊ शकतो. अशात तुम्हाला मास्क वापरणे आणि त्याच्या वापरासोबतच इतरही गोष्टींचा विचार करावा लागेल. याबाबत वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून आतापर्यंत नवीन गाइडलाईन जारी केली जाईल, हे सांगणं जरा कठिण आहे. पण सुरक्षा म्हणून तुम्ही ही काळजी घेऊ शकता.
8 / 9
सद्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले त्यानुसार तुम्ही जास्त घाबरण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला काही सामान्य गोष्टींवर लक्ष देऊ शकता. त्यासाठी सुरक्षेसाठी मास्क वापरा. खोकणाऱ्या किंवा शिंकणाऱ्या लोकांपासून जास्तीत जास्त दूर रहा. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे तुम्हाला जर कोरोनाची लक्षणे असतील किंवा सामान्य सर्दी-खोकला असेल तरी सुद्धा बाहेर पडू नका. योग्य तो सल्ला घेऊन चेकअप करा.
9 / 9
कोविड-19 ची लागण होण्यापासून बचाव करायचा असेल तर सरकारकडून, तज्ज्ञांकडून सांगण्यात आलेल्या सर्व नियमांचं पालन करा. हात सतत साबणाने धुवा, सर्दी-खोकला असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात येऊ नका, मास्क लावून ठेवा.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सResearchसंशोधन