Coronavirus: कोरोनाबद्दल सोशल मीडियात चुकीच्या अफवा; 'या' दाव्यांवर विश्वास ठेवू नका By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 2:47 PM
1 / 10 सत्य - अशाप्रकारे गुळणी केल्याने श्वासाशी निगडीत व्हायरसवर परिणाम होत नाही. ब्लीच आणि इथनॉलपासून गुळण्या करणं धोकादायक असतं. आईस्क्रीम खाण्यानेही फरक पडत नाही. थंड अथवा उष्ण तापमानाने विषाणू मरत नाहीत. 2 / 10 सत्य - कोरोनाग्रस्तामध्ये जास्त करुन सामान्य आजाराप्रमाणे लक्षण दिसतात. मात्र सामान्य आजारापेक्षा दहापटीने कोरोना आजार धोकादायक आहे. 3 / 10 सत्य - WHO नुसार लसणात आजारांपासून वाचण्याचे अनेक गुण असतात. मात्र सध्या कोरोना व्हायरसवर याचा कितपत परिणाम होतो याबाबत सांगता येत नाही. 4 / 10 सत्य - अमेरिकेत खोटा दावा करण्यात आला की, कोलाइडल सिल्वर(एका लिक्विडमध्ये चांदी टाकलेले कण) १२ तासात कोरोनाला मारुन टाकतात. मात्र चांदी पिल्याने किडणी खराब होण्याची शक्यता आहे. 5 / 10 सत्य - हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. श्वास रोखल्याने तुम्हाला व्हायरस आहे की नाही याची समजत नाही. 6 / 10 सोशल मीडियात कोरोनाबद्दल अनेक मॅसेज व्हायरल केले जात आहेत. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन शासनाकडून केलं जात आहे. मात्र कोरोनापासून बचाव करायचं असेल तर या गोष्टी कराव्यात असे दावे केले जात आहेत. यात नेमकं सत्य काय हे आम्ही सांगणार आहोत. 7 / 10 सत्य - मास्क लावल्याने १०० टक्के वाचण्याची गॅरंटी नाही. व्हायरस डोळ्यानेदेखील पसरु शकतो. मास्क खोकला, शिंकणे यांच्यापासून वाचवू शकतो. कोरोनाचा प्रसार होण्याचं हे महत्त्वाचं कारण आहे. कोरोनाग्रस्ताने मास्क लावला तर हा व्हायरस दुसऱ्याला होण्यापासून रोखलं जाऊ शकतं. रोजच्या कामात मास्क लावल्याने जास्त फरक पडत नाही. 8 / 10 सत्य - कोरोनावर उपचार म्हणून लस बनवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अद्याप याला वेळ लागण्याची शक्यता आहे. जर १ वर्षात लस बनवण्यात आली तरी ते कमी कालावधीत होईल. 9 / 10 सत्य - उष्ण तापमानात कोरोना विषाणूचं काय होणार याची सध्या अनेक तज्ज्ञांना कल्पना नाही. सर्व अनुमान SARS आणि MERS च्या आधारे केले जात आहेत. सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियासारख्या उष्ण प्रदेशातही हा व्हायरस पसरला आहे. हॉर्वड मेडिकल रिसर्चनुसार व्हायरस चीनच्या वेगवेगळ्या तापमानातही पसरत आहे. 10 / 10 सत्य - सोशल मीडियावर मॅसेज व्हायरल होत आहे की, १५ मिनिटे पाणी पिल्याने तुमच्या घशात अडकलेला व्हायरस पोटात जातो, त्याठिकाणी तुमच्या रोग प्रतिकारक शक्तीपासून या विषाणूचा खात्मा केला जातो. मात्र श्वासाशी निगडीत कोणताही व्हायरस अशाप्रकारे संपुष्टात येत नाही. मात्र पाणी पिण्याचे वेगळे फायदे आहेत. आणखी वाचा